शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत संमत झालेल्या कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी; विरोधक, शेतकऱ्यांचा विरोध निष्फळ

By कुणाल गवाणकर | Updated: September 27, 2020 19:27 IST

कृषी विधेयकांच्या विरोधात २५ सप्टेंबरला शेतकऱ्यांनी पुकारला होता भारत बंद

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात संमत झालेल्या शेतकरी आणि शेतीशी संबंधित तीन विधेयकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या विधेयकांना शेतकरी आणि विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला. विविध राज्यांमध्ये लाखो शेतकरी विधेयकांविरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आपला निषेध दर्शवण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी भारत बंद पुकारला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना विधेयकांवर स्वाक्षरी न करण्याची विनंती केली होती. मात्र याचा कोणतीही उपयोग झालेला नाही. कोविंद यांनी तीन विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे.कृषी विधेयकांना भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं जोरदार विरोध केला. अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही मोदी सरकारच्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. कृषी विधेयकं संसदेत मंजूर करून घेण्यात आली. राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माईकची मोडतोड केली. उपसभापतींसमोरील नियम पुस्तिका फाडली. यानंतर आवाजी मतदानानं विधेयकं मंजूर करण्यात आली. याच्या निषेधार्थ अकाली दलानं भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.मोदी सरकारनं ५ जूनला तीन अध्यादेश काढले होते. तेव्हाही विरोधकांकडून जोरदार विरोध झाला. यानंतर पावसाळी अधिवेशनात सरकारनं तीन विधेयकं मांडली. ही तिन्ही विधेयकं संसदेत मंजूर झाली. मात्र राज्यसभेत मतदानावेळी मोठं रणकंदन झालं. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी ८ खासदारांना निलंबित केलं. राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांनी विरोधी पक्षांच्या वतीनं राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. विरोधी पक्षांशी संवाद न साधता सरकारनं कृषी विधेयकं आणली असा आक्षेप आझाद यांनी नोंदवला. 'कृषी विधेयकं ना निवड समितीकडे पाठवली गेली, ना स्थायी समितीकडे पाठवली गेली. पाच वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले. यासाठी विरोधी पक्ष सातत्यानं निदर्शनं करत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलनं करत आहेत. शेतकरी घाम गाळून अन्न पिकवतो. तो देशाचा कणा आहे,' असं आझाद यांनी राष्ट्रपतींच्या भेटीनंतर म्हटलं होतं. 

टॅग्स :FarmerशेतकरीParliamentसंसदRamnath Kovindरामनाथ कोविंद