शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Droupadi Murmu Oath Ceremony: द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती, सरन्यायाधीशांनी दिली शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 10:31 IST

मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं होतं.

द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ गेतली. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांन ऐतिहासिक विजय मिळवला. मुर्मू यांनी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा यांना पराभूत केलं. एकीकडे भाजपाशासित राज्यात, तसेच मुर्मूंना पाठिंपा जाहीर करणाऱ्या पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मतदान झालं होतं.

राष्ट्रपती भवनातील सेंट्रल हॉलमध्ये मुर्मू यांचा शपथविधी सोहळा पार पडला. “ज्याचा जन्म स्वतंत्र भारतात झाला अशी मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. स्वतंत्र भारताच्या नागरिकांसोबतच आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपल्याला तेजी आणायला हवी. माझा जन्म ओडिशातील एका आदिवासी गावात झाला. परंतु लोकशाहीच्या ताकदीनं मला इथवर पोहोचवलं,” असं मुर्मू म्हणाल्या.

“एका महत्त्वपूर्ण कालखंडात देशानं माझी निवड राष्ट्रपती म्हणून केली आहे. आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत आहोत. जेव्हा माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाली होती तेव्हा आपण स्वातंत्र्याची ५० व्या वर्षाचं पर्व साजरं करत होतो. आता ७५ वर्षे पूर्ण होताना मला नवी जबाबदारी मिळाली आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.कॉलेजला जाणारी पहिली मुलगीमी माझ्या जीवनाची सुरूवात ओडिशातील एका छोट्या आदिवासी गावापासून केली होती. मी ज्या ठिकाणाहून येते त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण घेणंही एका स्वप्नाप्रमाणे होतं. परंतु अनेक बाधा पार करत मी कॉलेजमध्ये जाणारी आपल्या गावातील पहिली मुलगी ठरले. एका गरीब घरातील आदिवासी क्षेत्रातील महिला आज भारताच्या सर्वोच्च संवैधानिक पदावर पोहोचते ही आपल्या लोकशाहीची ताकद असल्याचं मुर्मू म्हणाल्या.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूPresidentराष्ट्राध्यक्षN V Ramanaएन. व्ही. रमणा