शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महामस्तकाभिषेक सोहळ्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 00:16 IST

श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे.

सांगली : श्रवणबेळगोळ येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाची तयारी जोराने सुरू आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत महोत्सवाला सुरुवात होत आहे.श्रवणबेळगोळ येथे दर बारा वर्षांनी भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळा होत असतो. यंदा ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेअकरा वाजता राष्ट्रपती कोविंद श्रवणबेळगोळ येथे येणार आहेत. त्यानंतर तासभर ते महोत्सवात सहभागी होतील, असे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.सांगली, कोल्हापूर, बेळगाव, चिक्कोडी, बोरगाव, बेडकीहाळ या परिसरातून शेकडो टन धान्य व इतर साहित्य आहारासाठी पाठविण्यात आले. सांगलीच्या मार्केट यार्डातून ८० टन धान्य रवाना झाले. यात बेदाणा, मिरची पावडर, खपली गहू, तांदूळ, डाळी, तेलाचा समावेश आहे. सन्मती संस्कार मंचानेही\ गावागावातून तीन टन धान्य जमा करुन पाठवले.श्रवणबेळगोळ येथे आहार साहित्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी स्वतिश्री चारुकीर्ती भट्टारक महास्वामी, महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील, भोजन विभागाचे प्रमुख विनोद बाकलीवाल उपस्थित होते. दोन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. श्रवणबेळगोळ येथील सर्व जैन मंदिरांमध्ये जैन तिर्थंकरांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आले. शनिवारी गुरूपूजा करण्यात आली. रविवारी भगवान आदिनाथ पंचकल्याण महोत्सवांतर्गत यक्ष-यक्षी, षोडशोपचार पूजा होणार आहे.- सन्मती संस्कार मंचच्या ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी या मोहिमेत भाग घेतला आहे. चार ते पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. वीर महिला मंडळाच्या २५०० भगिनीही नियोजनात सहभागी आहेत.

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदSangliसांगली