शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विधेयकांबाबत तीन महिन्यांत निर्णयाचे राष्ट्रपतींनाही बंधन; सर्वोच्च न्यायालयाची प्रथमच कालमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 05:19 IST

Supreme Court President news: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती.

नवी दिल्ली : राज्यपालांनी रोखलेल्या तसेच राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकांवर राष्ट्रपतींनी ३ महिन्यांच्या आत आपला निर्णय द्यायला हवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेतामिळनाडूतील विधेयकांशी संबंधित वादावर दिले आहेत. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या १० विधेयकांना सर्वोच्च न्यायालयाने ४ दिवसांपूर्वी मंजुरी दिली होती. न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. या निर्णयात न्यायालयाने विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्व राज्यपालांकरिता कालमर्यादा निश्चित केली आहे.

या खटल्याचा ४१५ पानांचा निवाडा न्यायालयाच्या वेबसाइटवर शुक्रवारी रात्री अपलोड झाला. त्यात  न्यायालयाने म्हटले की, गृहमंत्रालयाने निश्चित केलेली मर्यादा आम्हाला योग्य वाटते. राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवले असेल, तर राष्ट्रपतींनी त्यावर संदर्भ प्राप्त होण्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत निर्णय देणे आवश्यक आहे.वेळ लागणार असेल तर योग्य कारणांची नोंद करावी.

राज्यपालपदाला कमी लेखत नाही; पण...

आम्ही राज्यपालपदाला कोणत्याही प्रकारे कमी लेखत नाही आहोत. आमचे फक्त एवढेच म्हणणे आहे की, राज्यपालांनी सांसदीय लोकशाहीच्या स्थापित परंपरांनुसार वागायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

कायदेमंडळाचा व लोकांना जबाबदार असलेल्या लाेकनियुक्त सरकारचा योग्य सन्मान केला जायला हवा. राज्यपालांनी एक मित्र, तत्त्वचिंतक आणि मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पाडायला हवी. 

मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, घटनेच्या अनुच्छेद २०० मध्ये विधेयकावर निर्णय देण्यासाठी कालमर्यादा घातलेली नाही. तथापि, अनुच्छेद २००च्या आधारे निर्णय घेण्याचे टाळून राज्यपाल विधिमंडळाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाहीत. राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करणे बंधनकारक आहे.

राष्ट्रपतींना व्हेटो नाही...

न्यायालयाने म्हटले की, अनुच्छेद २०१ अन्वये राष्ट्रपतींना विधेयक नाकारण्याचा ‘अर्ध नकाराधिकार’ (पॉकेट व्हेटो) अथवा ‘पूर्ण नकाराधिकार’ (ॲब्सोल्यूट व्हेटो) नाही.

राज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले असेल आणि राष्ट्रपतींनी ते राखून ठेवले असेल तर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात येऊ शकते.

राज्यपालांनी एकदा परत पाठवलेले विधेयक राज्य सरकारने दुसऱ्यांदा मंजूर करून राज्यपालांकडे पाठवले असेल, तर राज्यपाल ते पुन्हा राष्ट्रपतींच्या विचारार्थ पाठवून अडवू शकत नाहीत. 

दुसऱ्यांदा आलेल्या विधेयकास राज्यपालांनी एक महिन्याच्या आत मंजुरी देणे आवश्यक आहे. न्यायालयाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेचे पालन न केल्यास राज्यपाल न्यायालयीन समीक्षेच्या कक्षेत येतील.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मूTamilnaduतामिळनाडू