शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

President Election: कोण आहेत द्रौपदी मुर्मू?; राष्ट्रपती पदासाठी NDA कडून मिळाली उमेदवारीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 22:32 IST

देशातील पहिली आदिवासी महिला राज्यपाल असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचा कारभार २०१५ मध्ये सांभाळला होता.

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू यांना NDA कडून उमेदवारीची संधी दिली आहे. भाजपा अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी या नावाची घोषणा केली आहे. राष्ट्रपतीपदी एका महिलेला संधी मिळावी यासाठी प्रयत्न होते. देशात पहिल्यांदाच आदिवासी समुदायातील राष्ट्रपती देण्याची तयारी केली आहे. 

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?देशातील पहिली आदिवासी महिला राज्यपाल असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचा कारभार २०१५ मध्ये सांभाळला होता. द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षक म्हणून कामाला सुरूवात करून ओडिशाच्या सिंचन विभागात नोकरी करत होत्या. १९९७ मध्ये द्रौपदी मुर्मू पहिल्यांदा नगरसेविका बनल्या होत्या. त्या एसटी मोर्चाच्या उपाध्यक्षा होत्या. २००४ मध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विधानसभेची निवडणूक लढवत यश मिळवलं होते. ओडिशात भाजपा अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षा, जिल्हा अध्यक्षा यासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या द्रौपदी मुर्मू यांनी सांभाळल्या. भाजपा-बीजद आघाडी सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून काम केले आहे. 

यशवंत सिन्हा विरोधकांचे उमेदवारराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. यशवंत सिन्हा यांचे नाव तृणमूल काँग्रेसनं समोर आणले होते. यशवंत सिन्हा हे चंद्रशेखर आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये अर्थ मंत्री म्हणून काम केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण निर्णयात यशवंत सिन्हा यांचे योगदान आहे. यशवंत सिन्हा यांनीच संसदेत बजेट मांडण्यासाठीची वेळ संध्याकाळी ५ ऐवजी सकाळी ११ वाजता केली होती. 

याबाबत जे. पी नड्डा म्हणाले की, एनडी घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पूर्वांचल भागातून कुणी उमेदवार असावं असं ठरवलं होते. त्यात आदिवासी भागातील महिला नेतृत्व द्रौपदी मुर्मू यांना संधी देण्यात येत आहे. आम्हाला अपेक्षा होती राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होईल परंतु विरोधकांनी त्यांच्या उमेदवाराची घोषणा आधीच केले असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्ष