शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

President Election: राष्ट्रपतिपदासाठी विद्यासागर राव, बंडारू दत्तात्रेय, पुरोहित, गहलोत, जर्मनी दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींकडून होऊ शकते शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 07:32 IST

President Election: राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांचा विचार सुरू आहे. याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जून रोजी जी-७ च्या बैठकीसाठी जर्मनीला जात आहेत. त्यामुळे दोन दिवसात भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय घेणे आवश्यक झाले आहे. या पदासाठी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. विद्यासागर राव, हरयाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांचा विचार सुरू आहे. याबाबत भाजपमध्ये विचारविनिमय सुरू आहे. भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठीही नवा चेहरा समोर आणला जाईल.

विद्यासागर राव ऑगस्ट २०१४ मध्ये राज्यपाल झाले ते पंतप्रधान मोदी यांच्या पसंतीनुसारच. बंडारू दत्तात्रेय हे मोदी सरकारमध्ये कामगार मंत्री होते व आता हरयाणाचे राज्यपाल आहेत. हे दोघेही तेलंगणातील असून क्षाशी निष्ठावंत आहेत. बनवारीलाल पुरोहित हे सरकारचे संकटमोचक आहेत. त्यांना संवेदनशील आसाम हे राज्य दिले होते. नंतर तामिळनाडूत पाठविले आणि आता ते पंजाबमध्ये आहेत. तर, थावरचंद गहलोत हे मध्य प्रदेशातील दलित नेते आहेत.

विद्यासागर राव व बंडारू दत्तात्रेय यांची नावे पुढे येण्यामागे हेही एक कारण आहे की, दक्षिणेतील ओबीसी नेत्याकडे राष्ट्रपतीपद जाऊ शकते. तेलंगणाचे राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन हेही ओबीसी आहेत आणि ते तामिळनाडूतील आहेत. पण, काहींचे म्हणणे आहे की, ते भाजपमध्ये नवीन  आहेत. जर राष्ट्रपतिपदावर पुरुष उमेदवाराची निवड झाली तर उपराष्ट्रपतिपदासाठी महिलेची निवड होऊ शकते. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची चर्चा आहे. मात्र, उपराष्ट्रपतिपदाबाबतच्या उमेदवाराचा निर्णय जुलैमध्ये होईल.

टॅग्स :Presidentराष्ट्राध्यक्षBJPभाजपाPoliticsराजकारण