शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी निर्यात धोरण समिती बरखास्तीची तयारी सुरू, संशोधक सल्लागारांसमवेतचा करार रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 03:34 IST

तीन सल्लागारांना वर्षभरापूर्वीच तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले होते.

विकास झाडे /टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या अ‍ॅपेडा या स्वायत्त संस्थेने कृषी निर्यात सल्लागारांसमवेतचा करार रद्द केला आहे. तीन सल्लागारांना वर्षभरापूर्वीच तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यात युवा कृषी संशोधक डॉ. परशराम पाटील यांचाही समावेश होता.कृषी धोरणात मोठे बदल करून कृषी माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासाठी संशोधकांची सल्लागार समिती काम करीत होती. ही समिती कागदावरही उरलेली नाही. अ‍ॅपेडाने स्थापलेली एईपीएस (कृषी निर्यात धोरण समिती) समिती बरखास्त करण्यावरही सध्या विचार सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सल्लागारांसमवेतचा करार रद्द होणे, एईपीएस समिती बरखास्तीची चर्चा यामुळे वाणिज्य मंत्रालय अ‍ॅपेडावर गदा आणण्याची शक्यता आहे.एकीकडे लॅटरल इंट्रीद्वारे खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती होत असताना अ‍ॅपेडातील (अ‍ॅग्रिकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी) मनुष्यबळ कमी होत असल्याने वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. अ‍ॅपेडाच्या कामकाजावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.>आयसीसीआरमध्येही पदभरती नाहीसॉफ्ट डिप्लोमसीत महत्त्वाची संस्था असलेल्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्समध्येही पुढची दोन वर्षे सांस्कृतिक संचालकपदासाठी भरती होणार नाही. विविध देशांमधील भारतीय दूतावासात या पदासाठी भरती होत असे.मोदी सत्तेत आल्यापासून सॉफ्ट डिप्लोमसीत भारत कें द्रस्थानी राहिला. त्यासाठीच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सांस्कृतिक संचालकपदी पारदर्शक पद्धतीने नियुक्त करण्यात आले होते. आता तेही थांबवण्यात येईल.