शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा वटहुकूम हाणून पाडण्याची तयारी; केजरीवाल ठाकरे, तर गुरुवारी पवारांना भेटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 05:58 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल पलटविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या वटहुकुमाचा विरोध म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या विरोधी पक्षांची ऐक्याची उपांत्य फेरी ठरणार असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली :केंद्रातील भाजप सरकारच्या हुकूमशाही स्वरूपाच्या वटहुकुमाला विरोधी पक्षांनी एकजूट होऊन संसदेत पराभूत करावे म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचा कार्यक्रम आखला आहे. केजरीवाल उद्या, बुधवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार आहेत. तत्पूर्वी केजरीवाल आज, मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला निकाल पलटविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या वटहुकुमाचा विरोध म्हणजे पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होणाऱ्या विरोधी पक्षांची ऐक्याची उपांत्य फेरी ठरणार असल्याचे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे. ‘आप’चे खासदार संजय सिंह, संदीप पाठक, दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेत ‘आप’च्या रणनीतीची माहिती दिली. 

रविवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भेट घेतली. दिल्लीत सुरू असलेल्या केंद्र सरकारच्या हुकूमशाहीसह अनेक राजकीय मुद्द्यांवर नितीशकुमार आणि यादव यांच्याशी चर्चा झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.

केंद्रातील मोदी सरकारने काढलेल्या या वटहुकुमावर संसदेत मोदी सरकारचे पुरेसे संख्याबळ नसलेल्या राज्यसभेने शिक्कामोर्तब करू नये म्हणून केजरीवाल यांनी सर्व विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्याची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निष्प्रभ करणारा वटहुकूम काढण्यापूर्वी मोदी सरकारने राज्यसभेत संख्याबळाची व्यवस्था करण्यासाठी बिजू जनता दल आणि वायएसआर काँग्रेसशी संपर्क साधला असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे