शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

मोदी सरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होणार; भाजपकडून मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 17:38 IST

8th Year Modi Government Prepration for Celebration : मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदीसरकारला पुढील महिन्यात 8 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यादरम्यान देशभरात लाभार्थी परिषद, युवा परिषद आणि मागासवर्गीयांसाठी परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. तसेच, देशातील मंदिरांमध्ये आपआपल्या स्तरावर पूजेचे कार्यक्रम आयोजित केले जातील. याशिवाय, या कार्यक्रमांमध्ये हनुमान चालिसाचे पठणही करण्यात येणार आहे.

मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ही टीम मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर होणारे कार्यक्रम ठरवणार आहे. देशभरात कार्यक्रमांसोबतच सरकारच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. भाजपने सप्ताह बुथ कमिटी टीम तयार केली आहे. या कमिटीमध्ये 4 ते 5 सदस्य असतील, जे देशभरात भाजप कमकुवत असलेल्या बूथवर भाजप मजबूत करण्यासाठी काम करतील.

दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी कमकुवत बूथ मजबूत करणे हे भाजपचे सर्वात मोठे लक्ष्य आहे. विजयंत पांडा हे भाजपच्या कमकुवत बूथ टीमचे नेतृत्व करत आहेत. या टीममध्ये भाजपचे सरचिटणीस सीटी रवी, लाल सिंग आर्य आणि इतर काही नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या देखरेखीखाली 12 नेत्यांची टीम तयार केली आहे. या संघाने कोणत्या स्तरावर काम करायचे आहे, याचा निर्णय 5 मेपर्यंत केंद्रीय नेतृत्वाकडे सोपविला जाणार आहे. यानंतर मोदी सरकारच्या 8 वर्षांचा उत्सव कसा साजरा करायचा हे ठरवले जाईल.

गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे उत्सव साजरा झाला नाहीयाआधी, मोदी सरकारने गेल्या वर्षी आपल्या कार्यकाळाची 7 वर्षे पूर्ण केली, तेव्हा कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला होता. त्यामुळेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपशासित राज्यांना सांगितले होते की, कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोदी सरकारच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. अशा कार्यक्रमांऐवजी राज्य सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी कल्याणकारी योजना सुरू कराव्यात. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारBJPभाजपा