शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बंड करून नवा पक्ष; जेलमधून आले अन् मुख्यमंत्री झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 11:43 IST

शिक्षक ते राजकारणी असा प्रेमसिंग यांचा प्रवास

गंगटोक : सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (एसकेएम) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत आला आहे. या पक्षाला विधानसभेच्या ३२ जागांपैकी ३१ जागा मिळाल्या आहेत. यामुळे सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत.

सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाचे अध्यक्ष पीएस गोळे ऊर्फ प्रेमसिंग तमांग यांनी २०१९ मध्ये १७ जागा जिंकत राज्यात २४ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या चामलिंग सरकारला हटविले होते. यावेळी त्यांनी ३२ पैकी ३१ जागा जिंकल्या आहेत.

चामलिंग यांच्या नेतृत्वाखालील एसडीएफचे संस्थापक सदस्य प्रेमसिंग तमांग यांनी २०१३ मध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंड करून सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाची स्थापना केली. त्यांनी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.

कोण आहेत तमांग? तमांग यांनी सरकारी शाळेत शिक्षक म्हणून तीन वर्षे काम केले.  १९९४ पासून ते सलग पाचवेळा सिक्कीम विधानसभेवर निवडून गेले. सरकारच्या चौथ्या कार्यकाळात (२००९-१४) चामलिंग यांनी त्यांना मंत्रिपद देण्यास नकार दिला. यानंतर तमांग यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. 

निधीची अपहार केल्याबद्दल २०१६ मध्ये गेले तुरुंगात२०१६ मध्ये, तमांग यांना १९९४ ते १९९९ दरम्यान सरकारी निधीची अपहार केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले आणि त्यानंतर त्यांचे विधानसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले. nप्रेमसिंग तमांग हे राज्यातील पहिले राजकारणी होते ज्यांना दोषी ठरवून विधानसभेतून निलंबित करण्यात आले होते. २०१८ मध्ये जेव्हा तमांग तुरुंगातून बाहेर आले.

टॅग्स :sikkimसिक्किम