शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
4
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
5
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
6
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
7
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
8
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
9
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
10
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
11
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
12
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
13
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
14
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
15
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
16
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
17
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
18
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
19
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

पुत्ररत्नाच्या इच्छेमुळे भारतात जन्माला आल्या 2 कोटी 10 लाख 'नकोश्या' मुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 12:48 IST

मुलगा व्हावा या इच्छेमुळे देशात 2 कोटी 10 लाख नकोश्या मुली जन्माला आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली- मुलगा व्हावा या इच्छेमुळे देशात 2 कोटी 10 लाख नकोश्या मुली जन्माला आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 2017-18 च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातून ही बाब समोर आली. भारतातील जवळपास २ कोटी १० लाख पालकांची पुत्ररत्न व्हावं अशी इच्छा होती मात्र, त्यांना कन्यारत्न झालं, अशी धक्कादायक आकडेवारी हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतो. सध्याच्या लोकसंख्येतील शून्य ते २५ वर्ष वयोगटातील मुली या पुत्राला प्राधान्य देणाऱ्या पालकांनी कन्यारत्न झाल्यानंतरही संतती नियमन न करता पुत्रप्राप्तीची इच्छा ठेवलेल्या पालकांच्या आहेत. इतकंच नाही, तर भारतातील बेपत्ता मुलींचं प्रमाण दिलं होतं. त्याहीपेक्षा नकोशा मुलीचे प्रमाण जास्त आहे. २०१४ मध्ये बेपत्ता मुलींची संख्या अंदाजे ६ कोटी ३० लाख इतकी होती. एका मुलीमागे १.०५ मुलगे असं नैसर्गिक प्रमाण असतं. पण, शेवटचं अपत्य मुलगा असण्याचं प्रमाण जास्त आहे. पहिल्या क्रमांकाच्या अपत्यासाठी हे प्रमाण १.८२ इतके आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी ते १.५५ आणि तिसऱ्यासाठी १.६५ असं आहे.

देशाला लैंगित समानता आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, ज्यामुळे लैंगिक समानतेमध्ये भारताच्या क्रमवारीत सुधारणा होऊ शकते, असा सल्ला दिला जातो आहे. अहवालानुसार, ईज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये रॅंकिंग वाढविण्यासाठी लैगिंक स्थितीत सुधारणेचे प्रयत्न केले पाहिजेत. लैंगिक समानतेमध्ये भारताची क्रमवारी घसरण्याचं कारण समाजाची विचारसरणी, पुत्रप्राप्तीला असलेली पसंती ही आहे. भारतीय समाजाला ही विचारसरणी बदलविण्याचा निश्चय करणं, गरजेचं आहे. 

रोजगारातून घटला महिलांचा सहभागदेशाच्या वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग 2005-06मध्ये 36 टक्के होता, हाच सहभाग 2015-16मध्ये घटून 24 टक्के झाला. शिक्षण व रोजगारात महिलांचा सहभाग वाढविणं गरजेचं असल्याचं अहवालात म्हंटलं आहे. 'बेटी बचाओ, बेटी पढाओ', 'सुकन्या समृद्धी'सारख्या सरकारी मुख्य योजनांबरोबरच सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना 26 आठवड्यांची प्रसुती रजा व 50 पेक्षा जास्त कर्मचारी सुविधा दिल्या आहेत. अहवालात ग्रामीण क्षेत्रात मोठ्या बदलावासाठी महिलांना भागीदारबरोबरच अॅग्रिकल्चर पॉलिसी आणण्याचा सल्ला दिला गेला आहे. तेथिल महिलांना शेतीसाठी कर्ज, तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी महिलांना शेतकरी महिलांना सशक्त बनवणं महत्त्वाचं आहे. कृषीक्षेत्राशी निगडीत कामात महिलांचा सहभाग वाढतो आहे, असंही अहवालात नमूद केलं आहे.