प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात बुधवारी पहाटे मौनी अमावस्येनिमित्त लाखो भाविक एकत्र आले. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक जखमी झाले. त्यावेळी संगम घाटावर नेमकं काय दृश्य होतं हे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं आहे. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आलेल्या एका महिलेने काय झालं ते सांगितलं आहे.
महिलेने सांगितलं की, "कुठेही जाण्याचा मार्ग नव्हता. काही लोक धक्काबुक्की करत हसत होते, पण आम्ही आमच्या मुलांवर दया दाखवण्याची भीक मागत होतो. रुग्णालयाबाहेर रडत असलेल्या सरोजिनी नावाच्या एका महिलेने सांगितलं की, आमचा ६० जणांचा ग्रुप दोन बसमधून आला होता. आमच्या अचानक धक्काबुक्की सुरू झाली आणि बरेच लोक खाली पडले."
"आम्ही अडकलो आणि गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. वाचण्याची संधीच नव्हती कारण सर्व बाजूनी धक्काबुक्की करण्यात येत होती." मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एका व्यक्तीने सांगितलं की, त्याची आई जखमी झाली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेघालयातील एका जोडप्यानेही चेंगराचेंगरीत अडकल्याचा त्यांचा भयानक अनुभव सांगितला.
प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यादरम्यान बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. यामध्ये संगममध्ये स्नान करण्यासाठी जाणाऱ्या ३० हून अधिक महिला जखमी झाल्या. प्रत्यक्षदर्शींनी ही घटना अतिशय भयानक असल्याचं सांगितलें. ही घटना पाहणारे जयप्रकाश स्वामी म्हणाले, "महिला गर्दीखाली अडकल्या होत्या आणि उठू शकत नव्हत्या आम्ही सर्वजण गर्दीत अडकलो होतो. मी सर्वात आधी बाहेर पडलो, नंतर मी मुलांना, आईवडिलांना वाचवलं."