शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:42 IST

खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे...

महाशिवरात्रीच्या स्नानाबरोबरच बुधवारी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याची सांगता झाली. कुंभमेळ्यात देशातील आणि जगभरातील कोट्यवधी श्रद्धाळूंनी प्रयागराज येथे येऊन संगमावर श्रद्धास्नान केले. यातच आता, जगद्गुरु शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्याची सांगता आधीच झाली होती. आता जे सुरू होते, तो 'सरकारी कुंभमेळा' सुरू होता. खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शंकराचार्य म्हणाले, 'पौर्णिमेच्या दिवशीच कुंभमेळ्याची सांगता झाली होती. सध्या जो सुरू आहे तो   सरकारी कुंभमेळा आहे. खरा कुंभमेळा माघ महिन्यातच असतो. माघ महिन्याची पौर्णिमा संपली आहे आणि कुंभमेळ्यात उपस्थित असलेले कल्पवासीही माघ महिन्याच्या पौर्णिमेनंतर आधीच परतले आहेत." एढेच नाही तर, आता सुरू असलेल्या सरकारी आयोजनाला तेवढे आध्यात्मिक महत्व नाही, जेवढे पारंपरिक कुंभमेळ्याला असते.

यावेळी जगद्गुरी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद गोहत्याविरोधात आंदोलनासाठी 17 मार्च ही तारीखही निश्चित केली आहे. ते म्हणाले, "आम्ही सर्वच राजकीय पक्षांना एकत्रित येण्यास आणि त्यांना गोहत्या हवी आहे की थांबवायची आहे, हे जाहीर करण्यास सांगितले आहे. कारण स्वातंत्रमिळाल्यापासून ती सुरूच आहे. आम्ही त्यांनी निर्णय देण्यासाठी 17 मार्चपर्यंतचा कालावधी दिला आहे."

गेल्या १३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या कुंभमेळ्याचा समारोप बुधवारी झाला. एकूण ४५ दिवस चाललेल्या या महाकुंभमेळ्यात जवळपास ६६.३० कोटी भाविकांनी गंगेच्या पात्रात आणि संगमावर स्नान केले. कुंभमेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत १.५३ कोटींहून अधिक भाविकांनी येते स्नान केले.

भाविकांच्या संख्येचा हा आकडा, चीन आणि भारत वगळता, अमेरिका, रशिया आणि यूरोपसह सर्वच देशांच्या लोकसंखेपेक्षा अधिक आहे. याशिवाय हा आकडा मक्का आणि व्हॅटिकन सिटी येथे जाणाऱ्या भाविकांच्या तुलनेतही बराच मोठा आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेश