शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
2
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
3
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
4
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
5
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
6
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
7
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
8
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
9
छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
10
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
11
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
12
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
13
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
14
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान
15
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
16
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
17
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
18
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
19
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
20
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू

"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 13:35 IST

​​इंद्रजित १ ऑक्टोबर रोजी कामासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियादला गेला होता. तिथे त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अंकित भारतीय उर्फ ​​इंद्रजित १ ऑक्टोबर रोजी कामासाठी सौदी अरेबियाची राजधानी रियादला गेला होता. तिथे त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला उंटाला चरायला नेण्याचं काम देण्यात आलं आहे. वाळवंटात अडकलेल्या इंद्रजितने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे घरी परतण्यासाठी मदत मागितली आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

इंद्रजितने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आणि त्याला ज्या कामासाठी आणलं होतं ते देण्याऐवजी त्याला वाळवंटात उंट चरायला घेऊन जाण्यास भाग पाडलं. व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडतो आणि इकडे एकटा पडलो आहे, खूप भीती वाटतेय असं सांगतो.

इंद्रजित आरोप करतो की, तो त्याची पत्नी पिंकी आणि सासरे राजेश सरोज यांच्या दबावाखाली परदेशात आला होता आणि आता वारंवार त्याच्या आईकडे परत जाण्याची विनंती करतो. त्याचे वडील जयप्रकाश भारतीय प्रयागराजमध्ये काम करतात.

जून २०२० मध्ये इंद्रजितचं लग्न झालं होतं आणि त्याला ३ वर्षांचा मुलगा आणि एका मुलगी आहे. इंद्रजित सौदी अरेबियामध्ये कंटाळल्याचं सांगत आहे. त्याच्या कुटुंबाला त्याची खूप काळजी वाटत आहे. व्हिडीओमध्ये तो खूप रडत असल्याने सर्वांनीच चिंता व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian man stranded in Saudi Arabia begs Modi for help.

Web Summary : Prayagraj's Indrajeet is stuck in Saudi Arabia, forced to herd camels. His passport was seized. He pleads to PM Modi for help returning home, citing pressure from his wife and in-laws.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश