जिल्हा परिषद वक्तृत्व स्पर्धेत प्रवीण गायकवाड प्रथम
By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST
सुरगाणा : तालुकास्तरीय संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये तालुक्यातील माणी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रवीण गायकवाड याचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा परिषद वक्तृत्व स्पर्धेत प्रवीण गायकवाड प्रथम
सुरगाणा : तालुकास्तरीय संपन्न झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये तालुक्यातील माणी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रवीण गायकवाड याचा वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्याची जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तालुक्यातील बुबळी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक तालुकास्तरीय स्पर्धा नुकतीच संपन्न झाली यामध्ये जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी झालेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये माणी जिल्हा परिषद शाळेतील प्रवीण रघुनाथ गायकवाड याचा प्रथम क्रमांक आला. जिल्हा स्तरावर होणार्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेसाठी प्रवीणची निवड झाली. त्याला मुख्याध्यापक एस. के. भोये, केंद्रप्रमुख के. एस. चौधरी आदिंचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)---महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पणसुरगाणा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या पायथ्याशी मूक आंदोलन करून महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.हे मूक आंदोलन सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत करण्यात आले. याप्रसंगी तालुका अध्यक्ष जनार्दन भोये, सरपंच काळु बागुल, भारती पवार, वामन दळवी, नामदेव भोये, रामदास गावित, वतन पवार, वामन गवळी, प्रवीण पवार आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)----