शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

अखेर तारीख ठरली! प्रशांत किशोर स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 14:49 IST

prashant kishor : प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल. 

पाटणा : बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येथील पक्षांनी आत्तापासूनच तयारी सुरु केली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या लाँचिंगची तारीख जाहीर केली आहे. प्रशांत किशोर २ ऑक्टोबर रोजी म्हणजेच महात्मा गांधी जयंतीदिनी अधिकृतपणे एक नवा पक्ष स्थापन करणार आहेत. 

प्रशांत किशोर यांनी गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण बिहार पिंजून काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अनेक सभा घेऊन त्यांनी बिहारमधील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. दोन वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर ते आता बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहेत. प्रशांत किशोर म्हणाले की, स्थापन केलेल्या नव्या पक्षाची संघटना सांभाळण्यासाठी २१ प्रमुख नेत्यांची कार्यकारी समिती स्थापन करण्यात येईल. 

प्रशांत किशोर यांची मुख्य ओळख निवडणूक रणनीतीकार अशी आहे. मात्र, २०२१ मध्ये ममता बॅनर्जींच्या पक्ष तृणमूल काँग्रेसला मोठा विजय मिळवून दिल्यानंतर प्रशांत किशोर यांनी जाहीर केले होते की, ते यापुढे निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. २ ऑक्टोबर २०२२ रोजी औपचारिकपणे राजकारणात येण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी संपूर्ण बिहारमध्ये यात्रा काढण्याची घोषणा केली होती. 

पीके या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रशांत किशोर यांनी २ ऑक्टोबर २०२२ रोजी जनसुराजची स्थापना केली. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पश्चिम चंपारण्य भागातून आपल्या यात्रेस सुरुवात केली होती. तेव्हापासून त्यांनी आजतागायत पाच हजार किमी चालल्याचा दावा केला आहे. त्यांनी बिहारचे १४ जिल्हे चालून, तर १० जिल्हे वाहनाने पिंजून काढले आहेत. यानंतर आता प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बिहारमधील सर्व २४३ जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रशांत किशोर हे मुस्लिम मतांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ७५ जागांवर मुस्लिम उमेदवार उभे करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच, आपल्या मुलांचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा, असे आवाहन प्रशांत किशोर बिहारमधील जनतेला करताना दिसतात. खासकरून दलित आणि मुस्लिमांनी जात आणि धर्माच्या आधारावर मतदान करू नये, असेही आवाहन प्रशांत किशोर यांच्याकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, बिहारच्या राजकारणामध्ये १९९० पासूनच सामाजिक न्यायाचा मुद्दा प्रभावी राहिला आहे. त्यातून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि त्यांची पत्नी राबडी देवी, तसेच विद्यमान मुख्यमंत्री व जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार यांचा उदय झाल्याचे दिसून आले. मात्र, प्रत्यक्षात चित्र काही फारसे सुधारलेले नाही. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांनी जेडीयूमधून आपली राजकीय इनिंग सुरू केली होती. २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना जेडीयूमध्ये क्रमांक दोनचे स्थान दिले, पण लवकरच ते दोघेही वेगळे झाले. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBiharबिहार