शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

२७ लाख vs २२ कोटी मतं... आम आदमी पक्षाला आणखी २० वर्ष लागतील, प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 13:59 IST

Prashant Kishor News: आम आदमी पक्ष राष्ट्रीय पातळीवरील पक्ष होण्याबाबत आणि केंद्रात भाजपला टक्कर देण्याबाबत एक मोठी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली आहे.

नवी दिल्ली- 

पंजाब विधानसभा निवडणुकीत (Punjab Election Result 2022) अभूतपूर्व विजय प्राप्त केल्यानंतर आम आदमी पक्षानं (AAP) राष्ट्रीय पातळीवर वर्चस्व गाजवण्याची तयारी सुरू केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पण निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक 'आप'बाबत एक महत्वाचं विधान केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्रात भारतीय जनता पक्षाचा (BJP) मुकाबला करण्यासाठी 'आप'ला किमान १५ ते २० वर्षे लागू शकतात.

प्रशांत किशोर यांनी आकडेवारीच दाखवलीएका न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी आपल्या वक्तव्यासोबत आकडेवारीही मांडली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'आप'ला एकूण २७ लाख मतं मिळाली होती. या देशात कोणत्याही पक्षाचं सरकार बनवायचं किंवा देश जिंकायचा असेल तर २० कोटींहून अधिक मतांची गरज आहे. एवढी मतं मिळविण्यासाठी केवळ काही वर्षे पुरेशी नसतील. कोणत्याही पक्षाला या पदावर यायला अनेक दशकं लागतात, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

'आप'ला १५-२० वर्षे लागतील'आप'ला भाजपला टक्कर देण्यासाठी बराच काळ द्यावा लागेल. यास 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधी लागू शकतो. एका रात्रीत काहीही होऊ शकत नाही. एक किंवा दोन राज्य जिंकणं ही वेगळी गोष्ट आहे, पण लोकसभा निवडणूक जिंकणं काही सोपी गोष्ट नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. 

फक्त काँग्रेस आणि भाजप हे पॅन इंडिया पक्ष"तत्वतः कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाची श्रेणी मिळू शकते. पण लोकसभा निवडणूक जिंकणं ही वेगळी बाब आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात काँग्रेस आणि भाजप हे दोनच पक्ष पॅन इंडिया पक्ष बनले आहेत. इतर कोणत्याही पक्षाला असं स्थान मिळवता आलेलं नाही. असं करण्यासाठी किमान १५-२० वर्षे प्रयत्न करावे लागतील", असेही ते म्हणाले. एवढा मोठा बदल रातोरात होत नाही. भाजपा आज ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत यायला पक्षाला ५० वर्षे लागली. भाजपने १९७८ मध्ये प्रयत्न सुरू केले आणि अनेक वर्षांनी युतीनं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश आलं होतं, असंही प्रशांत किशोर म्हणाले. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस मतं२०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं जनसमर्थन मिळालं होतं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला १७.१६ कोटी मतं मिळाली होती. पण २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या मतांची टक्केवारी आणखी वाढली. २०१९ च्या लोकसभेत ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला एकूण २२.९० कोटी मतं मिळाली. २०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेश (४.२८ कोटी), पश्चिम बंगाल (२.३० कोटी), मध्य प्रदेश (२.१४ कोटी), राजस्थान (१.९० कोटी), गुजरात (१.८० कोटी) आणि महाराष्ट्रात (१.४९ कोटी) मतं मिळाली. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरAAPआपBJPभाजपाArvind Kejriwalअरविंद केजरीवाल