शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्राणप्रतिष्ठा सुफळ संपूर्ण, बाहुबली मुनींद्र भगवान यांचा पंचकल्याणक महोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 06:36 IST

Baahubali Munindra Bhagwan: श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठदिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. १९ जानेवारीपासून विविध प्रकारचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले

सोनगड - श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्टतर्फे आठदिवसीय पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात साजरा करण्यात आला. १९ जानेवारीपासून विविध प्रकारचे विधी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले आणि २६ जानेवारी रोजी भगवान बाहुबली यांच्यावरील महामस्तकाभिषेकाने या भव्य आणि दिव्य अनुभूती देणाऱ्या सोहळ्याची सांगता झाली.

या सोहळ्याचे प्रमुख निमंत्रक आणि विश्वस्त नेमिष शाह यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध नियोजनाने बाहुबली भगवान यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुफळ संपूर्ण झाला. या सोहळ्यात नूतन जिनमंदिर निर्माण करून सुमारे १३० देवतांचे पूजन, स्थापना करण्यात आली.  नेमिष शाह यांच्या विनंतीला मान देऊन या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, मनसुख मांडवीय यांनी विशेष  हजेरी लावली.  

या विशेष सोहळ्याला भारतातून, तसेच परदेशातील विविध ठिकाणांहून १५ ते २० हजार भाविक उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा, गुरूंचे प्रवचन, असे नेटके आयोजन करण्यात आले होते. 

४१ फुटांची भगवान बाहुबली यांची प्रतिमाश्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट यांनी सोनगड येथे ५० फूट उंच पर्वतावर ४१ फुटांची भगवान बाहुबलीची भव्य प्रतिमा उभारण्यात आली.  या भव्य मूर्तीवर महाअभिषेक करण्यात आला. त्याआधी गर्भ कल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक, मोक्षकल्याणक असे विशेष विधी करण्यात आले. प्रतिष्ठाचार्य सुभाषभाई शेठ आणि बालब्रह्मचारी हेमंतभाई गांधी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हे विधी केले. 

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रJain Templeजैन मंदीर