शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव रॉय, राधिका रॉयवर सेबीने घातली दोन वर्षांची बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 03:59 IST

दाम्पत्य न्यायालयात जाणार; कर्ज करारातील माहिती दडविल्याचा आरोप

मुंबई : बाजार नियामक सेबीने एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिका रॉय यांच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. या काळात त्यांना न्यू देल्ही टेलिव्हिजन लि. म्हणजेच एनडीटीव्हीचे संचालकपद अथवा अन्य कोणतेही महत्त्वाचे पद स्वीकारता येणार नाही. या काळात त्यांना बाजारातून नवे भांडवलही उभारता येणार नाही.सेबीने म्हटले की, आयसीआयसीआय बँक आणि विश्वप्रधान कमर्शिअल प्रा.लि. (व्हीसीपीएल) यांच्याकडून घेतलेल्या कर्जाच्या करारातील मूल्य संवेदी (प्राईस सेन्सिटिव्ह) माहिती रॉय दाम्पत्याने जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. प्रणव रॉय आणि राधिका रॉय आणि एनडीटीव्हीची प्रवर्तक आरआरपीआर होल्डिंग यांची गुंतवणूक दोन वर्षांपर्यंत गोठविण्यात आली आहे. कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत संचालकपद स्वीकारण्यास त्यांच्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे.एनडीटीव्हीची समभागधारक संस्था क्वांटम सेक्युरिटीजने याप्रकरणी सेबीकडे तक्रार केली होती. २०१७ च्या कर्ज कराराविषयीची अचूक माहिती एनडीटीव्हीने जाहीर केलेली नाही, असे या तक्रारीत म्हटले होते. त्यावर सेबीने चौकशीचे आदेश दिले. एनडीटीव्ही आणि आरआरपीआर या कंपन्यांवर रॉय दाम्पत्य संचालक असलेल्या २००८ ते २०१७ या काळातील व्यवहारांची चौकशी करण्यात आली. जून २००९ मध्ये एनडीटीव्हीमध्ये रॉय यांची ६३ टक्के हिस्सेदारी होती.सेबीने म्हटले की, एनडीटीव्हीने आयसीआयसीआय बँकेसोबत एक, तर व्हीसीपीएलसोबत दोन कर्ज करार केले आहेत. या करारांत मूल्य संवेदी माहिती आहे. तथापि, ही माहिती सेबीला देण्यात आली नाही. याशिवाय रॉय दाम्पत्याने व्हीसीपीएलला बेकायदेशीर लाभ मिळवून देण्यासाठी दोन ‘कॉल आॅप्शन’ करारांवरही स्वाक्षऱ्या केल्या.सेबीचा आदेश अस्वीकारहार्यसेबीच्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यासाठी रॉय दाम्पत्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेबीच्या आदेशाला आपण वरील न्यायालयात आव्हान देऊ. सेबीचा आदेश चुकीच्या आढाव्यावर आधारित असून, अत्यंत असामान्य आणि अस्वीकारहार्य आहे. त्याविरुद्ध आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देऊ.