शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जी यांच्या सल्ल्यामुळे काँग्रेसने पलटविली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:39 IST

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे.

संतोष ठाकूर नवी दिल्ली : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने ज्या वेगाने हालचाली केल्या त्यास यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी चर्चा केलेली चर्चा कारणीभूत आहे. काँग्रेसचे पदाधिकारी त्यावर स्पष्टपणे बोलण्यास तयार नसले, तरी राहुल गांधी व सोनिया गांधी यांची प्रणव मुखर्जींशी चर्चा वाढली आहे. त्यांची राजकीय विषयावरही चर्चा होत असेल. कर्नाटकच्या राजकारणावरही चर्चा झाली असेल. त्यानंतर, काँग्रेसने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. याची अपेक्षा भाजपालाच काय, पण काँग्रेसच्याही काही नेत्यांना नव्हती.कर्नाटक निवडणुकीत निर्माण झालेल्या परिस्थितीवर राहुल गांधी यांनी माजी राष्ट्रपतींशी चर्चा केली होती. सोनिया गांधी याही बोलल्या होत्या. त्यांच्या सल्ल्यानंतर काँग्रेसने वेगवाग हालचाली केल्या, असे सांगण्यात येते. अशा हालचाली आतापर्यंत भाजपाकडून होत असत.प्रणव मुखर्जी जेव्हा काँग्रेसमध्ये सक्रिय होते, तेव्हा त्यांचे मत होते की, तरुणांना पुढे आणायला हवे, पण ज्येष्ठ नेत्यांनाही महत्त्वपूर्ण भूमिका द्यायला हवी. त्यांच्या अनुभवाचा आणि संपर्काचा लाभ पक्षाला मिळतो. याचाच परिणाम म्हणून कर्नाटक प्रकरणात गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. दुसरीकडे पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी आक्रमक हल्ला सुरू ठेवला आहे.>चर्चेनंतरच वेगवान घडामोडीमाजी राष्ट्रपतीशी संबंधित एका लेखकाने सांगितले की, जेव्हापासून राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी ते माजी राष्ट्रपतींशी एवढी चर्चा करत नव्हते. ते आता नियमितपणे त्यांना भेटतात. अर्थात, चर्चा शिष्टाचाराच्या कक्षेतच होते. पण त्यांच्यात राजकीय विषयांवर निश्चित चर्चा होत असेल. राजकारणाच्या बाबतीत माजी राष्ट्रपतींच्या रणनीतीला तोड नाही. याचाच फायदा काँग्रेसला मिळत आहे. अलीकडच्या घटनाक्रमातील वेगवान घडामोडींमागे असेच महत्त्वाचे सल्ले असल्याचे नाकारले जाऊ शकत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेस