शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचं कौतुक, 'आयुष्यमान भारत' योजनेचं गुणगान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 15:14 IST

बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले.

नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि गेट्स फाऊंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदी सरकारचं कौतुक केलं आहे. केंद्र सरकारच्या 'आयुष्यमान भारत' योजनेच्या यशस्वीतेमुळे गेट्स यांनी ट्विटरवरुन पीएमओ आणि भारत सरकारचे अभिनंदन केले. केवळ 100 दिवसांत 6 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे वाचून आपल्याला आनंद झाल्याचे गेट्स यांनी म्हटलंय.

बिल गेट्स यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन भारत सरकारचे कौतुक केले. 'आयुष्यमान भारत' योजनेच्या पहिल्या 100 दिवसांच्या यशस्वीतेबद्दल भारत सरकारचे अभिनंदन. या योजनेचा फायदा लोकांकडून मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे, हे ऐकून आनंद झाला, असे ट्विट गेट्स यांनी केले आहे. दरम्यान, आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 2 जानेवारी रोजी ट्विट करून, पहिल्या 100 दिवसांत आयुष्यमान भारत योजनेतून 6 लाख 85 हजार नागरिकांना लाभ मिळाल्याचं सांगितलं होतं. तसचे नागरिकांकडून या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. बिल गिट्स यांनी आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांचे ते ट्विट रिट्विट करून भारत सरकारला शुभेच्छा देत अभिनंदन केलं. 

मोदी सरकारने गतवर्षी 2018 मध्ये आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ केला होता. 25 सप्टेंबर रोजी दिन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या योजनेला सुरुवात करण्यात आली होती. त्यानुसार, गरीब कुटुंबातील व्यक्तींन वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे. सध्या, बुधवारपर्यंत देशातील 8.50 लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.    

टॅग्स :Bill Gatesबिल गेटसNarendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारत