शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवर जवानांचे टेन्शन संपविणार ‘प्रहरी’, नोकरी आणि सेवा सुरक्षा संबंधित प्रत्येक अपडेट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 08:30 IST

पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल. 

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवर २४ तास डोळ्यात तेल घालून बसलेल्या भारतीय जवानांचे टेन्शन आता संपणार आहे. या जवानांसाठी आता एक ॲप तयार करण्यात आले असून, त्याचे नाव प्रहरी आहे. पगार आणि भविष्य निर्वाह निधीची माहिती मिळवणे असो किंवा रजा आणि सरकारी निवास सुविधा मिळवणे असो, हे ॲप जवानांच्या सर्व गरजा पूर्ण करेल. गृहमंत्री अमित शहा यांनी लाँच केलेल्या या ॲपमुळे प्रत्येक आवश्यक माहिती आणि सुविधा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतील, जेणेकरून जवान आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढवता येईल.

काय मिळतील सुविधा? सॅलरी स्लिप । जीपीएफ । घर । बायोडेटा । तक्रार निवारण । आयुष्मान-सीएपीएफ । कल्याणकारी योजनांसाठीच्या सूचना । सेवानिवृत्तीशी संबंधित लाभ

कसा करता येणार ॲपचा वापर? गुगल प्ले स्टोअरवर जाऊन प्रहरी ॲप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर रेजिमेंटल नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर पासकोड सेट करावा लागेल. 

मॅन्युअल बदल कार्यक्षमता वाढवेल? सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) १३ नियमावलीत सुधारणा केली आहे. यामुळे अधिकारी आणि जवानांमध्ये ऑपरेशन, प्रशासन आणि प्रशिक्षणाची चांगली समज वाढेल आणि त्यांच्या कामाला गती मिळेल. मॅन्युअल अपडेट केल्याने बीएसएफचे सर्व स्तरावरील जवान आणि अधिकारी आरामात काम करू शकतील.

ॲपमध्ये प्रत्येक समस्येवर उपायबीएसएफ जवानांच्या किरकोळ समस्याही या ॲपद्वारे सोडवल्या जातील. वास्तविक, हे ॲप गृह मंत्रालयाच्या पोर्टलशीही जोडलेले असेल. केंद्रिकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीद्वारे, जवानांच्या प्रत्येक तक्रारीचे निर्धारित वेळेत निराकरण केले जाईल. हे ॲप सक्रिय प्रशासनाचे मॉडेल म्हणून तयार केले गेले आहे. त्यानंतर जवानांना ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करता येणार आहे.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलtechnologyतंत्रज्ञान