प्रज्ञा - आखाड्यात पावसाची हजेरी व्यापारी हतबल : मोठे आर्थिक नुकसान
By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST
मढ : उदापूर (ता. जुन्नर) येथील काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाचा आज (दि. १३) दुसरा दिवस असून कुस्त्यांचा जंगी आखाडा अवकाळी पावसामुळे उरकता घ्यावा लागला. त्यामुळे परिसरातून व मुंबई, पुणे, नगर, नारायणगाव, जुन्नर व आदिवासी प्यातून आलेल्या बर्याचशा मल्लांना कुस्ती न खेळताच परत जावे लागले.दुपारी तीन वाजता पाऊस थोड्या प्रमाणात ...
प्रज्ञा - आखाड्यात पावसाची हजेरी व्यापारी हतबल : मोठे आर्थिक नुकसान
मढ : उदापूर (ता. जुन्नर) येथील काळभैरवनाथ व मुक्तादेवी यात्रा उत्सवाचा आज (दि. १३) दुसरा दिवस असून कुस्त्यांचा जंगी आखाडा अवकाळी पावसामुळे उरकता घ्यावा लागला. त्यामुळे परिसरातून व मुंबई, पुणे, नगर, नारायणगाव, जुन्नर व आदिवासी प्यातून आलेल्या बर्याचशा मल्लांना कुस्ती न खेळताच परत जावे लागले.दुपारी तीन वाजता पाऊस थोड्या प्रमाणात सुरू झाला. तरीही उदापूर ग्रामस्थांनी पाऊस थांबण्याची वाट पाहत चार वाजता थोडा पाऊस कमी झाल्यावर आखाडा सुरू केला. पहिल्यापासूनच मोठाल्या कुस्त्या लावायला सुरुवात केली. परंतु, काही वेळातच जोरात पाऊस आल्यामुळे ग्रामस्थांना आखाडा आवरता घ्यावा लागला. यामुळे लांबून आलेल्या खूपशा मल्लांना कुस्ती खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी ग्रामस्थांनी कमी वेळेत जास्तीत जास्त कुस्त्या घेऊन पहिलवानांना न्याय देण्याची व कला दाखवण्याची संधी दिली. या वेळी सरपंच बबन कुलवडे, दत्तात्रय आरोटे, दिलीप आरोटे, अविनाश शिंदे, मच्छिंद्र कुलवडे, रवींद्र भोर, संजय शिंदे, मोहन वलव्हणकर, संजय ढमढेरे, आशीष जगताप, तुकाराम आरोटे, सागर मंडलिक, प्रदीप आमुप व ग्रामस्थ उपस्थित होते.अवकाळी पाऊस दुपारी तीन वाजल्यापासूनच सुरू झाल्यामुळे परिसरातील भक्त व महिलावर्ग पावसामुळे कालच्या तुलनेत आज दहा टक्केही लोक आले नाहीत. त्यामुळे यात्रेत विक्रेत्यंाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. काल यात्रेत लाखो नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे आजचा हंगाम मोठ्या प्रमाणात होईल, अशी व्यापार्यांना आशा होती. परंतु, अवकाळी पावसाने पूर्ण यात्राच फोडली. यामुळे हॉटेल व्यावसायिक, सरबतवाले, कलिंगड विक्रेते, आईस्किम विक्रेते, तसेच महिलांच्या सौंदर्यप्रसाधनांची, लहान मुलांच्या खेळण्याची विक्री करणारे अशा सर्वच व्यापार्यांचे आर्थिक नुकसान झाले.अचानकच आलेल्या पावसाने ज्या शेतकर्यांचे कांदे शेतात काढून पडलेले आहेत व ज्याचे डेंगळे काढून वाळवण्यासाठी उन्हात पसरून ठेवले आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली.फोटो१) उदापूरला ग्रामस्थांनी पावसातही आखाडा सुरू करून कुस्त्या खेळू दिल्या.2) अवकाळी पावसामुळे यात्रेत झाला शुकशुकाट.3) पाऊस आल्यामुळे नागरिक दुकानामध्ये आसर्याला उभे होते.०००००