शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

महिलेच्या ट्विटला ‘प्रभू’ धावले

By admin | Updated: November 29, 2015 03:35 IST

कटकाळात सोशल नेटवर्क साईट्सचा वापर सुरक्षेसाठी किती उत्तम प्रकारे होऊ शकतो; याची प्रचिती एका महिला रेल्वे प्रवाशाला आली. झालेही तसेच, गुरुवारी सायंकाळी धावत्या रेल्वेमध्ये

मुंबई : संकटकाळात सोशल नेटवर्क साईट्सचा वापर सुरक्षेसाठी किती उत्तम प्रकारे होऊ शकतो; याची प्रचिती एका महिला रेल्वे प्रवाशाला आली. झालेही तसेच, गुरुवारी सायंकाळी धावत्या रेल्वेमध्ये एका पुरुष प्रवाशाने गैरवर्तन केल्याचे टष्ट्वीट संकटग्रस्त महिला नम्रता महाजन यांनी केले आणि त्याची दखल थेट केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीच घेतली. त्यानंतर झालेल्या हालचालींमुळे संबधित महिलेला तातडीने मदत मिळाली व तिचा जीव भांड्यात पडला.नम्रता महाजन गुरुवारी टे्रन नंबर १८०३० ने एकट्याच प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका पुरुष रेल्वे प्रवाशाने त्यांना त्रास देण्यात सुरुवात केली. त्या प्रवास करत असलेली रेल्वे शेगाव स्थानकाहून पुढे जात असतानाच हा प्रकार घडत होता. काहीशा घाबरलेल्या नम्रता यांनी ऐन संकटात सोशल नेटवर्क साईट्सची मदत घेतली. आपल्यासोबत घडत असलेल्या प्रकाराची तक्रार त्यांनी थेट टष्ट्वीटरवर केली. तक्रार करताना त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना टष्ट्वीटरवर टॅग केले.शेगाव रेल्वे स्थानकाहून रेल्वे पुढे सरकत असतानाच सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांच्या सुमारास त्यांनी मंत्र्यांकडे टष्ट्वीटद्वारे तक्रार करत मदत मागितली. एक पुरुष सहप्रवासी आपणाला त्रास देत आहे. मी घाबरले आहे. तरी कृपया टे्रन नंबर १८०३० मध्ये मदत पोहचवा, अशा आशयाचे टष्ट्वीट त्यांनी केले. याचवेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी वेद प्रकाश यांनी हे टष्ट्वीट पाहिले आणि त्यांच्याशी संपर्कही साधला, असे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.वेद प्रकाश यांनी प्रसंगावधान राखत डीआरएम भुसावळशीही संपर्क केला. भुसावळ स्थानक येताच साधारणत: ४० मिनिटांच्या अंतराने एक आरपीएफ जवान रेल्वेमध्ये दाखल झाला आणि संकटात असलेल्या नम्रता महाजन यांना मदत केली. यावेळी प्रतीक्षा यादीवर असलेल्या पुरुष प्रवाशाच्या असभ्य वर्तनामुळे आपण घाबरल्याचे त्यांनी कथन केले. शिवाय संबधित प्रवासी अपशब्द वापरत असल्याचेही त्यांनी तक्रार केली. महत्त्वाचे म्हणजे टष्ट्वीटवरून मदत मागितल्यानंतर काही क्षणात का होईना; आपणाला मदत करण्यात आल्याबद्दल महाजन यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभारही व्यक्त केले. (प्रतिनिधी)