शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात मशिदीवर आत्मघातकी हल्ला; भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या मौलानाच्या मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:05 IST

पाकिस्तानात रमजान सुरु होण्यापूर्वीच भीषण स्फोट झाला असून यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.

Pakistan Blast:पाकिस्तान पुन्हा एकदा स्फोटाने हादरला आहे. पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या मशिदीमध्ये शुक्रवारी जोरदार स्फोट झाला. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात असलेल्या मशि‍दीमध्ये झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात पाच लोक ठार झाले असून अनेक लोक जखमी झालेत. सुसाईड बॉम्बरने शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये स्फोट घडवून आणला. हल्लेखोराने नमाज संपताच स्वत:ला उडवले. या हल्ल्यात पाकिस्तानातील फादर ऑफ तालिबान मौलाना समी-उल हक यांचा मुलगा मौलाना हमीद उल हक हक्कानी याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला.

पवित्र रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अकोरा खातख जिल्ह्यात हा स्फोट झाला. ही मशीद तालिबान समर्थक  जामिया हक्कानियाच्या अंतर्गत होती. स्फोटानंतर पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जामिया हक्कनिया मदरशात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही.

या आत्मघातकी हल्ल्यातमौलाना हमीद उल हक हक्कानी ठार झाला. हमीद उल हक हक्कानी हा पाकिस्तानातील हक्कानिया मदरशाचा प्रमुख होता. हक्कानी हा त्याच्या भारतविरोधी वक्तव्यामुळे चर्चेत होते. हक्कानी हा पाकिस्तानी तालिबानचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना समी-उल-हक यांचा मुलगा होता. हक्कानीच्या वडिलांचीही त्यांच्या घरात हत्या झाली होती. 

ज्या मदरशामध्ये हा स्फोट झाला त्या मदरशामध्ये सुमारे ४,००० विद्यार्थी राहतात. त्यांना मोफत अन्न, कपडे आणि शिक्षण दिले जाते. पाकिस्तानी मदरसे अनेक दशकांपासून अतिरेक्यांना जन्म देणारे ठिकाण म्हणून काम करत आहेत. तिथे हजारो निर्वासितांना शिक्षण दिले जाते. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत किमान पाच लोकांचा मृत्यू झाला आहे, तर डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोट झाला तेव्हा मशिदीच्या आत मोठ्या संख्येने लोक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मौलाना हमीद उल हक हक्कानी यांच्या सुरक्षेसाठी १० ते १५ जण तैनात करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटात हे लोक जखमीही झाले.

दरम्यान, तालिबान या दहशतवादी संघटनेचा जनक म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानी धर्मगुरू मौलाना समी-उल-हक याचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. रावळपिंडीच्या गॅरिसन टाऊनमध्ये त्याची हत्या झाली. मौलाना समी-उल-हक यांच्या विचारांचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या तालिबानमध्ये मोठा प्रभाव होता.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानBlastस्फोट