शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीज महागणार? आयात कोळशाच्या महागाईचा बोजा ग्राहकांवर टाकण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 12:08 IST

power ministry : वीज मंत्रालयाने उच्च किंमतीच्या आयातित कोळशाचा भार ग्राहकांवर टाकण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. म्हणजेच येत्या काळात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशात वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने वीज केंद्रे ठप्प पडण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान, देशांतर्गत कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज संकट अधिक गडद होण्याची भीती असताना, वीज मंत्रालयाने उच्च किंमतीच्या आयातित कोळशाचा भार ग्राहकांवर टाकण्याच्या निर्णयाला समर्थन दिले आहे. म्हणजेच येत्या काळात वीज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोळशाचा तुटवडा आहे.

डिसेंबर 2022 पर्यंत काही कोळशावर आधारित वीज प्रकल्पांसाठी आयात केलेल्या कोळशाची उच्च किंमत ग्राहकांना देण्याचे मान्य करण्यात आले आहे, असे केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले की आयात केलेले कोळसा आधारित वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर विजेच्या वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत कोळशावर आधारित युनिट्सवर दबाव येईल.

विजेची उपलब्धता वाढण्याची अपेक्षादरम्यान, अदानी समूह, टाटा पॉवर आणि एस्सार यांसारख्या आयातित कोळशावर आधारित युनिट्स वीज निर्मिती करून राज्य वितरण कंपन्यांना विकण्यास सक्षम असल्याने या निर्णयामुळे विजेची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. तसेच, या महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जा मंत्री आर के सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एस्सारचा 1,200 मेगावॅटचा सलाया प्लांट आणि अदानीचा 1,980 मेगावॅटचा मुंद्रा येथील प्लांट यांचा समावेश करताना आयात केलेल्या कोळशाचा उच्च खर्च ग्राहकांवर टाकण्यावर सहमती दर्शविली होती.

टॅग्स :Indiaभारत