शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

दिल्लीतून ट्रेन निघाली, अचानक लाईटच गेली; संतप्त प्रवाशांनी टीटीईला पकडून टॉयलेटमध्ये बंद केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 10:58 IST

आनंद विहार येथून सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या वेळापत्रकानुसार निघाली, मात्र वीज खंडित झाल्यानंतर झालेल्या गदारोळामुळे उशीर झाला.

भारतीय रेल्वेचा प्रवास हा नुसता प्रवास नसून आयुष्यभर तुमच्यासोबत राहणारा अनुभव असतो. हा प्रवास कधी वाईट अनुभव देतो तर कधी चांगला अनुभव. शुक्रवारी सायंकाळी अशीच एक घटना समोर आली. आनंद विहार ते गाझीपूर या सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी वाईट अनुभव आला.

दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवरून उत्तर प्रदेशातील गाझीपूरला जाणारी सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस आनंद विहार येथून वेळेवर रवाना झाली. आपला हॉर्न वाजवून पुढे गेली एवढ्यात दोन डब्यांतील लाईट गेली. वीज बिघाड झाल्यामुळे एसीही बंद पडला.यामुळे प्रवशांचा संताप वाढला.

मुंबईत कारची वीजेच्या खांबाला धडक; भीषण अपघातात गाडीचे २ तुकडे

उष्णतेमुळे डब्यातील लहान मुले व महिलांची अवस्था बिकट होती. B1 आणि B2 डब्यातील प्रवाशांनी ट्रेनमधील टीटीई पाहून संतापले. प्रवाशांनी सगळा राग त्याच्यावरच काढला. ट्रेनमधील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातला आणि टीटीईला पकडून शौचालयात कोंडले.

हे प्रकरण वाढताच रेल्वेचे कर्मचारी आणि रेल्वे पोलीस दलाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा हा प्रकार वाढत गेल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत रेल्वेच्या दोन डब्यातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.

तुंडला रेल्वे स्थानकावर पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ट्रेन थांबली आणि इंजिनीअर्सच्या पथकाने ट्रेनच्या डब्यात वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणाचा तपास सुरू केला. काही मेहनतीनंतर बी 1 कोचमधील पॉवर कटची समस्या दूर झाली आणि काही वेळाने बी 2 कोचमध्ये पुन्हा वीज आली आणि ट्रेन रवाना झाली.

सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमधील हा बिघाड आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल ट्रेनमधील प्रवाशांनी ट्विट करून आपल्या समस्या सांगितल्या. मिळालेल्या माहितीनुसार, तुंडला रेल्वे स्थानकावर वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर गाडी २ तासांहून अधिक काळ उभी होती. आधीच उशिराने धावणाऱ्या या गाडीला वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणखी उशीर झाला. आता ही ट्रेन जवळपास 5 तास उशिराने धावत आहे.