शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमधील उचापतखोरांना फक्त बंदुकीची भाषा कळते- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:49 IST

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. ...

काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात सामर्थ्य आणि युक्ती या दोन्हींचा वापर केला पाहिजे. मात्र, त्याचवेळी काही उचापतखोरांना फक्त बंदुकीची आणि सामर्थ्याची भाषाच कळते, हेदेखील लक्षात ठेवावे असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले. जम्मू-काश्मीर स्टडी सेंटरतर्फे नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित सप्तसिंधू जम्मू-काश्मीर लद्दाख महोत्सवाचे उद्घाटन डॉ. भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहन भागवत बोलत होते. त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये सत्याचा विजय व्हायचा असेल तर शक्ती आणि युक्ती दोहोंचा वापर करणे गरजेचे आहे. भारतीय लष्कराच्या प्रयत्न, त्याग आणि निष्ठेमुळे काश्मीरमध्ये भारताचे सामर्थ्य अबाधित आहे. काही उचापतखोरांना सामर्थ्याचीच भाषा कळते, असे मोहन भागवत यांनी म्हटले. 

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना भारतीय उपखंडातील सर्व लोकांचा डीएनए एकच आहे. काश्मीर प्रश्नाकडे एक समस्या म्हणून बघितले जाऊ नये. अनेकजण आमची भाषा वेगळी असल्यामुळे काश्मीर स्वतंत्र करावा, अशी मागणी करतात. आपल्याला भारताच्या अखंडतेचा विसर पडल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगीट, पाकिस्तान, सियाचीन एवढेच नव्हे तर पूर्व काबूल, म्यानमारमधील चिंद्वीन नदीचा काबुलपर्यंतचा पश्चिम भाग, चीनकडील बाजूस असणारा तिबेटचा उताराचा प्रदेश आणि श्रीलंकेचा दक्षिण भाग हा सर्व अखंड भारताचा परिसर असल्याचे भागवत यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील युवकांचे मतपरिवर्तन करून त्यांना सरकारविरोधात भडकावले जात आहे. सैनिकांसह, सरकारी बसवर दगडफेक केली जात आहे. काश्मीरमध्ये जे काही आहे, ते सरकारचे आहे. त्यामुळे दगडफेकीतून होणारे नुकसान हे आपलेच नुकसान आहे हे सर्वाना पटवून सांगण्याची गरज आहे. सरकारची मदत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असेही भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतJammu Kashmirजम्मू-काश्मीर