शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 06:20 IST

खासगीकरणावर अती अवलंबून राहू नका, जनतेचे हक्क खासगीकरणाने हिरावून घेता येणार नाहीत

डॉ. खुशालचंद बाहेती, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: सुरक्षित, नीटनेटके आणि वाहनसुलभ रस्ते हा संविधानाच्या अनुच्छेद २१ अंतर्गत हमी दिलेला जीवनाचा मूलभूत अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने  म्हटले आहे.

मध्य प्रदेश रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमपीआरडीसी) या सरकारी उपक्रम व एका खासगी कंत्राटदारामध्ये राज्य महामार्गाच्या बांधकाम व देखभालीवरून वाद निर्माण झाला. एमपीआरडीसीने कंत्राटदाराविरुद्ध दाखल केलेली याचिका हायकोर्टात मान्य झाली. कंत्राटदाराने सुप्रीम कोर्टात अपील केले आणि युक्तिवाद केला की, याचिका सरकार विरुद्ध दाखल होऊ शकते, खासगी संस्थेविरोधात नाही. ते खासगी व्यक्ती असल्याने हायकोर्टाने त्यांच्याविरुद्धची याचिका स्वीकारणेच चुकीचे होते.  

हे काम सार्वजनिक  आहे, याचिका करता येईल  

सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवत स्पष्ट केले की, रस्ते विकासासारख्या कामांमध्ये खासगी कॉन्ट्रॅक्टर कंपनीविरुद्ध याचिका होऊ शकते, कारण हे कार्य सार्वजनिक स्वरूपाचे आहे.

जनतेचे हक्क खासगीकरणाने हिरावून घेता येणार नाहीत

पायाभूत सुविधा खासगी भागीदारीत दिल्यामुळे होणाऱ्या दर्जा व उत्तरदायित्वाच्या प्रश्नांवर या निर्णयामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले की, नागरिकांचे मूलभूत हक्क आवश्यक सेवांचे खासगीकरण करून हिरावून घेता येणार नाहीत.  रस्त्यांची सुरक्षितता व रस्त्यांवर प्रवेशाचा हक्क राज्य सरकारचीच जबाबदारी आहे. या निर्णयाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. 

सुप्रीम कोर्ट म्हणाले...

रस्त्यांचा अधिकार घटनेच्या अनुच्छेद १९(१)(ग) आणि अनुच्छेद २१ अंतर्गत स्वातंत्र्य व जगण्याच्या मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे. राज्याने रस्ते खड्डेमुक्त ठेवण्याची जबाबदारी स्वतःकडे ठेवली पाहिजे. रस्ता दुरुस्ती खासगी कंत्राटदारांकडे सोपवून शासन जबाबदारी टाळू चालणार नाही. सार्वजनिक सेवांसाठी खासगीकरणावरील अती अवलंबतेपासून राज्यांनी सावध राहिले पाहिजे. न्या. जे. बी. पारडीवाला, न्या आर. महादेवन.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयMadhya Pradeshमध्य प्रदेश