शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा-विधानसभा निवडणूक लांबणीवर? ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या अध्यक्षतेत समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2023 06:58 IST

१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याच्या एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’च्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. त्यामुळे आगामी लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली.१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याच्या एका दिवसानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

सत्ताधाऱ्यांना अनुकूल? मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजप नेहमीच भव्य मध्यवर्ती कल्पना घेऊन जनतेचा पाठिंबा मिळविण्यासाठी मोठ्या कल्पना राबवत असतो. ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ हा मुद्दा पक्षाला राजकीयदृष्ट्यादेखील अनुकूल ठरेल, असा नेत्यांचा विश्वास आहे.

कोविंद यांचे समर्थन..१७व्या लोकसभा निवडणुकीनंतर संसदेच्या संयुक्त बैठकीवेळी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणुकां’चे जोरदार समर्थन केले होते.  

परिणाम काय? मिझोरम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थान या पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यानंतर पुढील वर्षी मे-जूनमध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. सरकारच्या या हालचालींमुळे लोकसभा निवडणुका किंवा त्याचवेळी होणाऱ्या काही राज्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत होणार आहेत.

सत्ताधारी पक्ष लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा कितीही प्रयत्न करत असले तरी, जनता त्याला फसणार नाही. हा ‘हुकूम’ म्हणजे सरकारच्या जाण्याची उलटी गणना सुरू झाली आहे.    - मल्लिकार्जुन खरगे,     अध्यक्ष, काँग्रेस

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’साठी समिती नेमण्याचे स्वागत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्याने लोकांचा तसेच सरकारचा वेळ आणि पैसा वाचेल.    - सी. आर. पाटील,     भाजप नेते 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाvidhan sabhaविधानसभाRamnath Kovindरामनाथ कोविंद