शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाख खातेदारांच्या घरी पोस्टमननी पोहचविली ४१२ कोटींची रोख रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 03:45 IST

जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशाच्या बँकिंग व्यवस्थेत एक क्रांतिकारक गोष्ट घडली आहे. एखाद्याचे खाते कोणत्याही बँकेत असो व तिची शाखा तुमच्या गावात किंवा शहरात नसली तरीदेखील जर खातेदाराने पोस्टाच्या स्थानिक कार्यालयात दूरध्वनी केला तर अवघ्या १० ते १५ मिनिटांच्या आत हवी असलेली रोख रक्कम घेऊन पोस्टमन त्याच्या घरी पोहोचेल. या सुविधेसाठी त्या व्यक्तीचे पोस्टात खाते असणे गरजेचे नाही. अशा रितीने पोस्टाने लॉकडाऊनच्या काळात देशभरात २१ लाख खातेदारांपर्यंत ४१२ कोटी रुपयांची रोख रक्कम लोकांपर्यंत पोहोचविली आहे.खातेदारांना ही रक्कम पोस्टमननी २४ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत पोहोचविली. हे खातेदार मुख्यत्वे ग्रामीण भागातील व जिथे बँकांच्या फारशा शाखा नाहीत, अशा ठिकाणचे रहिवासी आहेत. पोस्टाची देशभरात १.८६ लाख कार्यालये असून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) अंतर्गत आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टिमद्वारे (एइपीएस) हे पैसे खातेदारांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे, अशी माहिती पोस्ट खात्याचे सचिव प्रदीप्तकुमार बिसोई यांनी दिली आहे.>औषधे, पीपीईचाही केला पुरवठालॉकडाऊनच्या काळात औषधे, पीपीइ यासारख्या वस्तूही पोस्टामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. विषाणूविरोधातील लढ्यामध्ये पोस्ट खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे. लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक व खासगी वाहतूक सेवा बंद असल्याने रुग्णालयांना औषधपुरवठा करण्याचे काम पोस्ट खात्याच्या वाहनांतूनही करण्यात आले. त्यामध्ये दोन लाख पोस्टमन सक्रिय भूमिका बजावत आहेत. आता लोक वीज, पाणी, डीटीएचची बिले किंवा पैशांचे अन्य बँक खात्यात हस्तांतरण आदी कामे आयपीपीबी अ‍ॅप किंवा पोस्टमनच्या मदतीने करू शकतात. त्यामुळे पेन्शनर, महिला, गरीब लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.