शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेस अध्यक्ष करा; प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 11:06 IST

राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानं काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त

भोपाळ: ज्योतिरादित्य शिंदे यांना काँग्रेसचं अध्यक्षपद द्या, असे बॅनर मध्य प्रदेशात झळकले आहेत. शिंदे यांच्याकडे काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा सोपवण्याचं आवाहन बॅनरच्या माध्यमातून राहुल गांधींकडे करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)मध्य प्रदेशचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद देण्यात यावं, असं आवाहन राहुल गांधींकडे करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीचा उल्लेख या बॅनरवर आहे. भोपाळमधील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर हा बॅनर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे कालच शिंदे यांनी पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. 'लोकसभा निवडणुकीत जनतेनं दिलेला कौल मान्य करून त्याची जबाबदारी मी स्वीकारत असून, मी माझ्याकडे असलेल्या पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करत आहे. माझ्याकडे हा पदभार सोपवून पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,' असं शिंदे यांनी राजीनामा देताना सांगितलं.2014 मध्ये मोदी लाट असूनही निवडून आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. गुना लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या कृष्णपाल सिंह यांनी शिंदे यांना सव्वा लाख मतांनी पराभूत केलं. सिंधिया यांच्याकडे पक्षानं उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागाची जबाबदारी सोपवली होती. मात्र त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस