शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये सुरू होणार पोस्टल बँक; दीड लाख शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:42 IST

जगातील सर्वांत मोठी बँक जुलै महिन्यात भारतात सुरू होणार आहे. टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : जगातील सर्वांत मोठी बँक जुलै महिन्यात भारतात सुरू होणार आहे. टपाल खाते दीड लाख शाखा असलेली पोस्टल बँक सुरू करण्याच्या तयारीला लागले आहे. रिझर्व्ह बँकेकडून १५ दिवसांत टपाल खात्याला बँकिंगची परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.सध्या त्याच्या रायपूर व रांची या दोनच शहरांत शाखा असून, पुढील वर्षी मार्चपर्यंत आणखी ६५0 शाखा सुरू होतील. त्यानंतरच्या दीड वर्षात दीड लाखांहून अधिक टपाल कार्यालयांत एक्सेस पॉइंट वा एक्स्टेंशन शाखा सुरू झालेल्या असतील. केंद्रीय दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. ती मिळाल्यानंतर १५ दिवसांत एक डझनाहून अधिक पोस्टल बँक शाखा सुरू होतील. ही अशी बँक असेल की जिच्या १ लाख ३३ हजारांहून अधिक ब्रँच वा एक्सेस पॉइंट ग्रामीण भागांत असतील. सध्या २३ हजार टपाल कार्यालयांत बँकिंगसाठी आवश्यक असणारी सीबीएस म्हणजेच कोअर बँकिंग सिस्टिम आहे.शिवाय ९९५ एटीएमही बसवण्यात आले आहेत. आम्ही ग्राहकांच्या घरी जाऊ नही बँकिंग सेवा देऊ शकू; शिवाय पोस्टमनमार्फतही खातेदारांना पैसे मिळतील.१0 हजार गावांत प्रत्येक कुटुंबाला विमादेशातील १0 हजार गावांत प्रत्येक घराला मार्च २0१९पर्यंत विमा योजनेशी जोडण्याचे लक्ष्य टपाल खात्याने ठरवले आहे. आतापर्यंत १२४४ गावांत हे काम पूर्ण झाले आहे, असे मनोज सिन्हा म्हणाले.

टॅग्स :bankबँकIndiaभारत