शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

शेकडो मतदानयंत्रांचा पोस्टाने ‘अर्जंट’ बटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:57 IST

पार्सले कुठे व कोणाला पाठविली, हे गुलदस्त्यात आहे

मुंबई : बंगळुरूच्या ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.’ (बीईएल) या सरकारी कंपनीने काही वर्षांत शेकडो मतदानयंत्रांचा टपालाने व हस्तपोच पद्धतीने पुरवठा केल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे. मात्र ही पार्सले कुठे व कोणाला पाठविली, हे गुलदस्त्यात आहे. मतदानयंत्रांचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या दोन सरकारी कंपन्यांपैकी ‘बीईएल’ एक आहे.मुंबईतील ‘आरटीआय’ कार्यकर्ते मनोरंजन एस. रॉय यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जांच्या उत्तरात ‘बीईएल’ने ही माहिती दिली आहे. मतदानयंत्रांचे उत्पादन व त्यांचा पुरवठा याविषयीच्या आकडेवारीत घोळ असल्याचा मुद्दा घेऊन रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकेवर बुधवारी होणाºया सुनावणीत ही माहिती सादर होण्याची शक्यता आहे.रॉय म्हणाले की, मतदानयंत्रांची ८२० ‘बॅलेट युनिट्स’ १९ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘बल्क पॅकेजिंग’ने पाठविल्याचे ‘बीईएल’ ने कळविले. कंपनीच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०१७ मध्ये दोनदा मिळून २४५ ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे हस्तपोच केली. एवढ्या मोठ्या संख्येने ‘बॅलेट युनिट््स’ टपालाने कुठे व कोणाला पाठविली व ती संबंधितांना मिळाली का, याचा उल्लेख कंपनीच्या उत्तरात नाही. कंपनीने ८२० ‘बॅलेट युनिट््स’ टपालाने पाठविली, त्याचे नऊ ‘डॉकेट नंबर’ दिले आहेत. त्यावरून नऊ खोक्यांमध्ये यंत्रे भरली होती असे दिसते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ६ व १० एप्रिल २०१७ रोजी अनुक्रमे ६५, ७० व ११० ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रे तीन पार्सलमधून हस्तपोच केली.