शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट ऑफिस खाती डिजिटल होणार; अर्थ मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 01:15 IST

सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क तयार होईल.

देशातील जवळपास 34 कोटी पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांना मे महिन्यापासून सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा मिळणार आहेत. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिसमधील बचत खाती इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेला (आयपीपीबी) लिंक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या सर्वांना डिजिटल बँकिंग सुविधेचा लाभ घेता येईल.अर्थ मंत्रालयाने पोस्ट ऑफिसमधील खात्यांना आयपीपीबीला लिंक करण्याची परवानगी दिल्याची माहिती अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे आता पोस्ट ऑफिसचे खातेधारक आपल्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात ऑनलाईन पैसे पाठवू शकतात. 34 कोटी बचत खात्यांपैकी 17 कोटी पोस्ट ऑफिस बचत खाती आहेत. तर उर्वरित खाती मासिक उत्पन्न योजना आणि आरडी या प्रकारात मोडतात. सरकारने उचललेल्या या पावलामुळे देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क तयार होईल. भारतीय पोस्ट खात्यांतर्गत येणाऱ्या 1.55 लाख कार्यालयांना आयपीपीबीला लिंक करण्याची योजना असल्याने देशात सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क उभे राहिल. 'आयपीपीबी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येते. तर पोस्ट ऑफिसच्या बँकिंग सुविधा अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. सध्या इतर बँकेचे ग्राहक या सेवांचा लाभ घेत आहेत. पोस्ट ऑफिस बचत खाती आयपीपीबीला लिंक झाल्यावर सर्व खातेधारक इतर बँकांच्या ग्राहकांप्रमाणे रोख हस्तांतरण सेवेचा वापर करु शकतात,' अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मे महिन्यापासून पोस्ट ऑफिसमध्ये खाती असलेल्या सर्वांना या सेवेचा लाभ घेता येईल. ही सेवा पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे ती स्वीकारायची की नाही, याची निवड ग्राहकांना करता येईल.पोस्ट पेमेंट बँकेच्या ६५० शाखापोस्ट आॅफिस ६५० आयपीपीबी शाखांचे काम सुरू करण्याचा विचार करत आहे. या सर्व ६५० शाखा जिल्ह्यातील छोट्या पोस्ट कार्यालयांना जोडलेल्या असतील. आयपीपीबी शाखा पोस्टाच्या नेटवर्कशी जोडल्या जातील. एकूण १.५५ लाख पोस्ट आॅफिस आहेत. यातील १.३ लाख शाखा ग्रामीण भागातील आहेत. १.५५ लाख शाखांसह पोस्ट हे भारतातील सर्वात मोठे बँकिंग नेटवर्क बनत आहे. दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरपासून खातेधारक सुकन्या समृद्धी योजना, ठेवी, स्पीड पोस्ट, यासाठी आयपीपीबी खात्यातून पैसे डिपॉझिट करू शकतील.कोणते व्यवहार करता येणार?आयपीपीबीचा ग्राहक एनईएफटी, आरटीजीएस आणि अन्य मनी ट्रान्सफर सेवेचा उपयोग करू शकतात. एकदा पोस्ट आॅफिस सेव्हिंग बँक खाते (पीओएसबी) आयपीपीबीशी लिंक केले की, खातेदार अन्य बँकांसोबत मनी ट्रान्सफरची सेवा घेऊ शकतो. खातेधारकांनी ही सेवा निवडली, तर त्यांचे खाते आयपीपीबीशी जोडले जाईल.

टॅग्स :digitalडिजिटलBanking Sectorबँकिंग क्षेत्र