शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

संयमानंतरचा स्फोट अधिक घातक असू शकतो, चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मधील लेखात भारताला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 02:32 IST

भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.

सौरभ कुमारमुंबई : भारतातील मोदी सरकारला आम्ही सांगू इच्छितो की, डोकलामप्रकरणी तुमचे आकलन पूर्णपणे चुकीचे आहे. तुमचा गैरसमज अतिशय धोकादायक आहे. आम्ही संयम ठेवला आहे.संघर्षाच्या प्रारंभिक टप्प्यात संयम ठेवणे ही आमची संस्कृती आहे; मात्र संयमानंतरचा स्फोट हा विजेसारखा असू शकतो, असा इशारा चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’च्या लेखात देण्यात आला आहे. भलेही चीनने ३० वर्षांत मोठे युद्ध केलेले नाही; पण अगदी अटीतटीच्या प्रसंगी प्रत्येक देश युद्धाचा पर्याय स्वीकारतो, असा इशाराही यात देण्यात आला आहे. या लेखात म्हटले आहे की, भारताला असे वाटते की, चीनला रस्ता तयार करण्यापासून रोखण्याचा भारताचा निर्धार हा चीनच्या निश्चयाला चिरडून टाकू शकतो. संपूर्ण चीनच्या जनतेची अशी मागणी आहे की, घुसखोरांकडून आमच्या ज्या भागावर ताबा घेण्यात आला आहे तो भाग परत घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला भारतीय किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीय ताकद रोखू शकत नाही. जर पीपल्स लिबरेशन आर्मीने हल्ला केला, तर भारत त्याचा राजकीय आणि आर्थिक परिणाम सहन करण्यास सक्षम राहणार नाही. अशा परिस्थितीत भारताला फायदाच होईल, असा अंदाज काही भारतीय संरक्षण तज्ज्ञ व्यक्त करीत असले तरी तो एक विनोद ठरेल.भारत आणि चीन यांच्यात डोकलाममध्ये ७० दिवसांपासून तणाव आहे. यावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या भागात सैन्य कायम राहील अशी भूमिका भारताने घेतली आहे. त्यावर भाष्य करताना या लेखात म्हटले आहे की, चीनची ताकद ओळखण्यात भारत गंभीर चूक करीत आहे. भारतीय सुरक्षा अधिकाºयांच्या हवाल्याने भारतातील मीडियाने असे वृत्त दिले आहे की, चीन युद्धाची जोखीम स्वीकारणार नाही. छोट्या संघर्षालाही चीन घाबरतो, पण वेळ आली, तर प्रत्येक देश युद्धासाठी तयार असतो, असेही यात म्हटले आहे.

(लेखक निवृत्त आयएफएस अधिकारी असून त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या व्हिएन्ना येथील कार्यालयात राजदूत म्हणून काम केलेले आहे. बंगळुरुच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स स्टडीज’मध्ये सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :IndiaभारतchinaचीनIndian Armyभारतीय जवानNarendra Modiनरेंद्र मोदीSushma Swarajसुषमा स्वराज