शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

मंत्र्यावरील हल्ल्यात आयईडीच्या वापराची शक्यता, घटनास्थळाजवळ लोखंडाची सळई व दुचाकी वाहनांची बॅटरी आढळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 01:18 IST

Possibility of use of IED in attack on minister : एसटीएफ व फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांसह सीआयडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली व नमुने गोळा केले.

कोलकाता : पश्चिम बंगालचे मंत्री जाकीर हुसेन यांच्यावर हल्ला करण्यासाठी आयईडीचा वापर केला असल्याची शक्यता सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. श्रममंत्री हुसेन हे मुर्शिदाबाद जिल्ह्यातील निमतिता रेल्वेस्थानकावर बुधवारी रात्री झालेल्या स्फोटात जखमी झाले होते.एसटीएफ व फॉरेन्सिक टीमच्या सदस्यांसह सीआयडी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा घटनास्थळाला भेट दिली व नमुने गोळा केले. त्यानंतर तपास संस्थेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, निमतिता स्थानकावरील स्फोटात आयईडीचा वापर केल्याची शक्यता बळावली आहे. घटनास्थळापासून १०० मीटर अंतरावर लोखंडाची सळई व दुचाकी वाहनांत वापरली जाणारी बॅटरी तसेच इलेक्ट्रिक सर्किट आढळले आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले असून, त्याची आम्हाला तपासात मदत होणार आहे.अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचे क्षण एका व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत. ते फॉरेन्सिक तपासासाठी पाठविले आहेत. त्यात मंत्र्याचा एक सहयोगी काही तरी हटविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते नेमके काय आहे, हे शोधले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, घटनेच्या वेळी तेथे हजर असलेल्या लोकांशीही चर्चा करण्यात आली आहे. लोकांचे म्हणणे आहे की, एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. ती बॅग हटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना स्फोट झाला. बॅगचे काही अवशेष मिळाले आहेत. या घटनेनंतर राज्य सरकारने संबंधित मंत्र्याला झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, हुसेन यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. हा हल्ला म्हणजे त्याचाच एक भाग आहे, असा आरोप राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करावी, असे राज्यपाल जगदीप धनखड यांनी म्हटले आहे.जंगीपूर विधानसभा मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार असलेले जाकीर हुसेन हे स्फोटात जखमी झाले होते. त्यांना गुरुवारी येथील एसएसकेएम रुग्णालयात आणण्यात आले होते. सरकारी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे. स्फोटात त्यांच्याबरोबर जखमी झालेल्या व रुग्णालयात भरती झालेल्या इतर १३ जणांची प्रकृतीही स्थिर आहे. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल