शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे भारतावर हल्ला करण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 00:26 IST

पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानातील लष्कर-ए-तय्यबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेईएम) यासारख्या संघटनांचे दहशतवादी समुद्रमार्गे येऊन भारतातील बंदरे, कार्गो जहाजे तसेच तेलवाहू जहाजांवर हल्ला चढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नौदल व तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.या संघटनांनी सागरी मार्गाने घुसखोरी करून हल्ले चढविण्यासाठी जून महिन्यापासून तयारी सुरू केली आहे. मुंबईत २००८ मध्ये अशा प्रकारेच हल्ले चढविण्यात आले होते. त्याच घटनांची पुनरावृत्ती भारतात अन्य ठिकाणी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खोल समुद्रात पोहण्याचे प्रशिक्षण जैश-ए-मोहम्मदकडून सध्या दहशतवाद्यांना दिले जात आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी नौदलाने १० दहशतवाद्यांना पोहण्यापासून अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले होते. या हल्ल्याच्या कटातील आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याची तपास यंत्रणेकडून २०१० मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यात ही बाब उजेडात आली. बलुचिस्तान मच्छीमार विभागामध्ये नोंदणी झालेल्या अल हुसैनी या ट्रॉलरमधून प्रवास करीत २००८ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारताच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर एम. व्ही. कुबेर या भारतीय बोटीवर कब्जा मिळवून ते तिच्याद्वारे मुंबईमध्ये दाखल झाले.संस्थांआडून कारवायाफलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन, अल दावा वॉटर रेस्क्यूसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या आडून दहशतवादी कारवाया सुरू असतात. या स्वयंसेवी संघटना दहशतवाद्यांना शेखपुरा, लाहोर, फैसलाबाद येथील कालवे तसेच तरणतलाव येथे जून महिन्यापासून पोहण्याचे प्रशिक्षण देत आहेत. खोल समुद्रात कार्गो किंवा तेलवाहू जहाजांचे अपहरण करून त्यांच्या माध्यमातून घुसखोरी करून भारतीय बंदरे व अन्य ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा कट दहशतवादी आखत आहेत.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला