शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रशासनात मोठे बदल? कॅबिनेट सचिव गौबा पीएमओत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 08:08 IST

केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नोकरशाहीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

हरीश गुप्ता-

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर नोकरशाहीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा प्रकृतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेऊ शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना आणि नंतर २०१४ पासून पीएमओमध्ये मिश्रा हे मोदींसोबत आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा पंतप्रधान कार्यालयात जातील, अशी जोरदार चर्चा आहे. 

गौबा यांनी पाच वर्षे सर्वांत जास्त काळ कॅबिनेट सचिव राहून इतिहास रचला आहे. त्यांचा विस्तारित कार्यकाळ ३० ऑगस्ट २०२४ रोजी संपत आहे. त्यापूर्वी पी. के. सिन्हा हे ४ वर्षे ७९ दिवस या पदी होते. सामान्यत: कॅबिनेट सचिवांना १ ते २ वर्षांसाठीच मुदतवाढ दिली जाते, पण मोदी यांनी गौबा यांच्याबाबतीत अपवाद करून पाचवी मुदतवाढ दिली. गौबा यांनी यापूर्वी अमित शाह यांच्या नेतृत्वात गृहसचिव म्हणून काम केले होते.विशेष म्हणजे, मोदींचे आणखी एक आवडते अधिकारी अजय भल्ला हे गृहसचिव आहेत. त्यांना २०२३ मध्ये चौथी मुदतवाढही देण्यात आली होती. त्यांचा विस्तारित कार्यकाळ ऑगस्ट २०२४ मध्ये संपणार आहे. 

संरक्षण सचिव गिरीधर अरमाणे यांचा नियमित कार्यकाळ १ नोव्हेंबर २०२४ पर्यंत आहे, तर वित्त सचिव टी. व्ही. सोमनाथन यांचा विस्तारित कार्यकाळ केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर होईपर्यंत असेल. त्यांची नियुक्ती एप्रिल २०२१ मध्ये झाली होती.  

अधिकाऱ्यांत नाराजी 

या अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मुदतवाढीमुळे आयएएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कारण, त्यामुळे या अधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या पदी संधी मिळत नाही. कॅबिनेट सचिव आणि ४ वरिष्ठ सचिव (गृह, वित्त, संरक्षण आणि परराष्ट्र) व सीबीआय आणि ईडीच्या संचालकांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी निश्चित आहे. 

मात्र, मनपसंत अधिकाऱ्यांचा कार्यकाळ एक ते दोन वर्षांनी वाढविण्याकडे कल वाढत आहे.  

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2024Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार