शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून काढलं घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 17:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे.24 वर्षीय नगमा परवीन बोलू शकत नाहीत. पण नगमाला जे काही बोलायचं असतं ते ती चित्र काढून सांगते. पतीला मोदी आणि आदित्यनाथ यांचं पेंटिंग दाखवणं नगमाला महागात पडलं आहे.

बलिया, दि. 9- पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र काढलं म्हणून पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय नगमा परवीन बोलू शकत नाहीत. पण नगमाला जे काही बोलायचं असतं ते ती चित्र काढून सांगते. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाकला असंविधानिक ठरविल्यानंतर नगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची पेंटिंग काढून तिच्या पतीला दाखवलं. पण पतीला मोदी आणि आदित्यनाथ यांचं पेंटिंग दाखवणं नगमाला महागात पडलं आहे. यामुळे नगमाला सासरच्यां लोकांनी बेदम मारहाण केली तसंच तिला वेडं ठरवत घराबाहेर काढलं. ही घटना बलियामधील बसारिकपूर या गावात घडली आहे.

सासरी मारहाण झालेली नगमा त्यानंतर तिच्या माहेरी गेली. तेथे तिच्या वडिलांनी या संदर्भातील तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून तपास केला जातो आहे. नवभारत टाइम्सने ही बातमी दिली आहे. 

सिकंदरपूर भागातील मटुरी गावची रहिवासी असणारी नगमा परवीन हिचं लग्न बसारिकपूर गावातील परवेज खान यांच्याशी 26 नोव्हेंबर 2016 मध्ये झालं. लग्नानंतर हुंड्यावरून तिच्या सासरच्या लोक तिला त्रास देत होते. सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाक असंविधानिक असल्याचा निर्णय दिल्यावर नगमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं पेंटिंग बनवलं. ते पेंटिंग नगमाने नंतर तिच्या पतीला दाखवलं. पण नगमाने केलेलं हे कृत्य तिच्या सासरच्या मंडळींना आवडलं नाही. त्यांनी नगमाला वेडं ठरवत मारहाण करायला सुरू केली. मारहाणीला कंटाळलेल्या नगमाने याबद्दलची माहिती तिच्या वडिलांना दिली. नगमाचे वडील सासरी आल्यावर त्यांनी सासरच्या मंडळींकडे प्रकरणाबद्दल विचारणा केली. तुमची मुलगी वेडी झाली आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचं पेंटिंग काढून ते घरात लावते आहे, म्हणून तिला इथे राहण्याचा अधिकार नाही, असं नगमाच्या सासरच्या लोकांनी तिच्या वडिलांना सांगितलं. 

सासरच्यांकडून मिळालेल्या या उत्तरानंतर नगमाच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून या संदर्भातील तक्रार दाखल केली. दरम्यान नगमाला हुंड्यावरून घरचे त्रास देत असल्याची तक्रार 20 जुलै रोजी दाखल झाली होती. नगमाने बनविलेल्या पेंटिंगनंतर जे काही घडलं याबद्दल माहिती असल्याचं सिकंदरपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख धर्मेद्र सिंह यांनी सांगितलं.