शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाची दयनीय अवस्था

By admin | Updated: November 5, 2015 23:29 IST

जळगाव- जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी मदत शेतकर्‍यांना मिळते. कपाशीचा हमीभावही फसवा आहे. हा जिल्हा कृषि व महसूलमंत्र्यांचा आहे, पण शेतकर्‍यांची अवस्था बिकट, दयनीय असल्याचे आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी शहरात आत्महत्यग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.

जळगाव- जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. पण फक्त ८० प्रस्ताव मंजूर होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली. शेतकर्‍यांनी कोट्यवधी रुपये भरून केळी पीक विमा काढला, पण केळी उत्पादकांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. तुटपुंजी मदत शेतकर्‍यांना मिळते. कपाशीचा हमीभावही फसवा आहे. हा जिल्हा कृषि व महसूलमंत्र्यांचा आहे, पण शेतकर्‍यांची अवस्था बिकट, दयनीय असल्याचे आमदार गुलाबराव पाटील गुरुवारी शहरात आत्महत्यग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात म्हणाले.
शिवकॉलनी येथील हनुमान मंदिरात हा कार्यक्रम सायंकाळी झाला. शिवकॉलनी परिसर बहुउद्देशीय संस्थेने आयोजन केले होते. व्यासपीठावर महापौर राखी सोनवणे , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू सुधीर मेश्राम, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन, मनसेचे नगरसेवक ललित कोल्हे, ग.स.चे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संचालक मनोज पाटील, आर.बी.पाटील आदी उपस्थित होते.

मुक्ताईनगरला झुकते माप
खरीप पीक विमा योजनेत मुक्ताईनगरातील शेतकर्‍यांना मोठी मदत मिळते. पण इतर तालुक्यांंमध्ये ६००, ७०० रुपये मदत मिळत आहे. केळी उत्पादकांनी पीक विमा काढला होता. पण विम्याची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. शासनाने त्याबाबतचे आपल्या वाट्याचे पैसेच संबंधित कंपनीकडे भरलेले नाहीत. यामुळे केळी उत्पादक विमा घेण्यास पात्र असताना त्यांना विम्याची रक्कम मिळत नाही. कृषिमंत्री जिल्ह्यात आहेत, परंतु अशी परिस्थिती आहे, असेही आमदार पाटील म्हणाले.
शेतकरी आत्महत्या दारूच्या कारणाने बेदखल
शेतकरी आत्महत्येची निम्मेपेक्षा अधिक प्रकरणे दारूचे कारण सांगून रद्द केली. असे असेल तर प्रथम दारूची दुकाने बंद करा, मग असे निर्णय घ्या, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
धरणगावात अनेक पदे रिक्त
धरणगावात वर्षभरापासून तहसीलदार नाही. कृषि सहायकांची ११ पदे रिक्त आहेत. कामे करताना अडचणी येतात. महसूलमंत्री आपल्या जिल्ह्यात असताना ही स्थिती आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

मी शेतकर्‍यांचा वकील
माझे बापजादे शेतकरी होते. आता सरकार कारखानदारांची बाजू घेते. शेतीसाठी स्वतंत्र बजेट हवे. शेतकर्‍यांना निवृत्ती वेतन दिले जावे. मी या मागण्या सरकारमध्ये असलो तरी करीत राहीन, मला शेतकर्‍यांनी निवडून दिल्याने त्यांची वकीली करणे, त्यांचे प्रश्न मांडणे माझे कर्तव्य आहे. मी उगीच टिका करीत नाही, असेही आमदार पाटील म्हणाले.