शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

"गरिब मुस्लिमांना 'टार्गेट' केलं जातं, खरे गुन्हेगार बंदूक घेऊन..."; ओवेसींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 15:54 IST

नूंह मधील बुलडोझर कारवाईवरून असदुद्दीन ओवेसींनी केलं बोचरं ट्विट

Asaduddin Owaisi On Nuh Violence: एमआयएम (AIMIM) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हरियाणातील नूह येथील हिंसाचाराच्या आरोपींवर खट्टर सरकारने केलेल्या बुलडोझर कारवाईमुळे भलतेच संतापले. ओवेसी यांनी ट्विट करून कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. ओवेसी म्हणाले की, हरियाणात गरिबांना बेघर केले जात आहे. गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य केले जात आहे. यावेळी ओवेसी यांनी कायदेशीर प्रक्रियेचाही उल्लेख केला. केवळ आरोपांच्या आधारे कारवाई केली जात असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच, एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी ट्विट केले की, 'सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, कोणतीही बुलडोझर कारवाई करण्यापूर्वी सरकारला कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल. इमारत मालकाला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही कारवाई करता येत नाही. केवळ आरोपांच्या आधारे शेकडो गरीब कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे. संघ विचारसरणीचे नेतेमंडळी जरी आपल्या तोडफोडीच्या राजकारणाचा अभिमान बाळगत असले तरी ते कायद्याने योग्य नाही आणि मानवतेच्या दृष्टीने इतरांवर अन्याय करणारेही आहे."

"हरियाणात गरीब मुस्लिमांनाच लक्ष्य करून एकतर्फी कारवाई केली जात आहे. खरे गुन्हेगार बंदुका घेऊन मोकाट फिरत आहेत. खट्टर सरकारने देखील गुन्हेगारांपुढे गुडघे टेकले आहेत. मातीची घरे आणि झोपडपट्ट्या पाडून स्वतःला मजबूत समजणे ही मोठी गोष्ट आहे का?" असा रोखठोक सवाल ओवेसींना केला.

प्रशासनाचा युक्तिवाद

प्रशासन केवळ मुस्लिमांची घरे पाडत आहे, तर इतर आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोप असदुद्दीन ओवेसींनी केला. त्यावर हरियाणाच्या प्रशासनाचा दावा आहे की जी घरे आणि दुकाने पाडण्यात आली, ती सर्व घरे आणि दुकाने आरोपींच्या नावावर आहेत, असे नाही.

नूह हिंसाचार सुनियोजित होता?

सूत्रांच्या हवाल्याने, नासिर आणि जुनैद यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नूह हिंसाचाराची योजना तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे. हा प्रश्न निर्माण होत आहे कारण हिंसाचारातील 8 आरोपींना राजस्थानच्या त्या भागातून अटक करण्यात आली आहे जिथे नसीर आणि जुनैदचे संबंध होते आणि हे सर्व क्षेत्र नूहपासून फक्त 50 किमीच्या परिघात येतात.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीHaryanaहरयाणाMuslimमुस्लीम