शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत पुन्हा वाढले हवेचे प्रदूषण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 04:01 IST

दिल्लीत हवेचे प्रदूषण रविवारी पुन्हा एकदा वाढले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. 

ठळक मुद्देगॅस चेंबर डोळ्यांची जळजळ आणि श्‍वास घेण्यास त्रास 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दिल्लीत हवेचे प्रदूषण रविवारी पुन्हा एकदा वाढले. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अनेक नागरिकांनी डोळ्यांची जळजळ आणि श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली आहे. यावरुन परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. ‘सेंटर कंट्रोल रुम फॉर एयर क्वालिटी मॅनेजमेंट’नुसार, आज दुपारी हवेतील पीएम (पार्टिकुलेट मॅटर) २.५ आणि पीएम १0 ची सघनता क्रमश: ४७८ आणि ७१३ होती. २४ तासांसाठी याच्याशी संबंधित सुरक्षा मानके ६0 आणि १00 आहेत. काही जागी दृश्यमानता १00 मीटरपेक्षा कमी होती. केंद्र सरकारच्या सफर अर्थात सिस्टिम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चने केलेल्या तपासणीतही प्रदूषण वाढल्याचे दिसून आले. 

अमेरिकेहून येणारे विमान रद्द  दिल्लीतील हवामान खराब असल्याचे कारण सांगत अमेरिकेतील यूनायटेड एअरलाइन्सने दिल्लीला येणारे विमान रद्द केले आहे. या एअरलाइन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्कहून दिल्लीला येणारे हे विमान हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे रद्द केले आहे. 

जुनी वाहने जप्त करण्याचे आदेश  दिल्लीतील १0 वर्षे जुनी डिझेल आणि १५ वर्षे जुनी पेट्रोल वाहने जप्त करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. रस्त्याच्या कडेला पार्किंग करणार्‍यांना रोखा, असे हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांनी स्पष्ट केले आहे. 

३४ रेल्वेंना विलंब : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेने या भागातील ३४ रेल्वे रद्द केल्या असून, २१ रेल्वेंच्या वेळेत बदल केला आहे आणि ८ रेल्वे रद्द केल्या आहेत. 

टॅग्स :pollutionप्रदूषणDelhi Gateदिल्ली गेट