शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३0३ मतदारसंघांमध्ये पूर्ण झाले मतदान; ईव्हीएमविषयी सर्वत्र तक्रारी, बंगालमध्ये हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 06:26 IST

तिसऱ्या टप्प्यात बड्या नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रांमध्ये बंद; केरळमध्ये मतदानाच्या रांगेत चार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदानाच्या वेळी प्रत्येक राज्यात ईव्हीएमविषयीच्या तक्रारी आल्या, तर केरळात व्हीव्हीपॅटमधून साप निघाल्याने कर्मचारी व मतदारांची धावपळ झाली. केरळातच मतदानाच्या रांगेत चौघांचा मृत्यू झाला आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मारामारी झाली. त्यात गावठी बॉम्ब फेकण्यात आला आणि हाणामारीत एका मतदाराचा मृत्यू झाला. पण अशा स्थितीतही ११७ मतदारसंघांतील तब्बल ६६ टक्के लोकांनी मतदान केले.आतापर्यंतच्या तीन टप्प्यांत मिळून लोकसभेच्या निम्म्याहून अधिक म्हणजे ३0३ मतदारसंघांत मतदान पूर्ण झाले आहे. यापुढील चार टप्प्यांत २४0 मतदारसंघांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील उरलेल्या १८ मतदारसंघांमध्येही २९ एप्रिल रोजी मतदान होईल. राज्यातील ३0 मतदारसंघांत दोन टप्प्यांत मतदान पूर्ण झाले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अध्यक्ष अमित शहा, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह व अखिलेश यादव, शरद यादव, मुख्तार अब्बास नकवी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर आदींनी मतदान केले.अमित शहा, मुलायम सिंह, मेहबुबा मुफ्ती, थरुर आदींचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रांत बंद झाले. नवीन पटनायक, पी. विजयन, विजय रूपाणी आदी मुख्यमंत्र्यांनीही आज मतदान केले. दक्षिणेकडील तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या पाच राज्यांतील सर्व मतदानसंघांतील मतदान आता पूर्ण झाले आहे.गोवा, पश्चिम बंगाल, आसाम व त्रिपुरा या चार राज्यांत ८0 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कमी मतदान झाले. कडक उन्हाचाही परिणाम काही राज्यांत झाला. मतदानाच्या वेळी मंगळुरूमध्ये जोरदार पाऊ स सुरू झाल्याने मतदारांची एकच तारांबळ उडाली. पहिल्या दोन टप्प्यांपेक्षा तिसऱ्या टप्प्यांत मतदान यंत्रांविषयी असंख्य तक्रारी आल्या. जवळपास सर्वच राज्यांमध्ये मतदान यंत्रे नीट काम करीत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे काही ठिकाणी ती बदलावी लागली. परिणामी मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अर्थातच मतदान यंत्रे बिघडल्याचा इन्कार केला. समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांनीच नव्हे, तर काही ठिकाणी भाजपतर्फेही काही ठिकाणी यंत्रांविषयी तक्रारी करण्यात आल्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक