१९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान प्रचार संपला: निवडणुकीची तयारी पूर्ण
By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST
दक्षिण सोलापूर:
१९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान प्रचार संपला: निवडणुकीची तयारी पूर्ण
दक्षिण सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात येणार असून, प्रशासनाची निवडणूक प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडजी, मुळेगाव तांडा आणि लिंबीचिंचोळी या तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. चिंचपूरच्या एका जागेसाठी एकच अर्ज आल्याने ही पोटनिवडणूकही बिनविरोध झाली आहे. उर्वरित निंबर्गी, वडापूर, वांगी या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी एकही अर्ज आला नाही. त्यामुळे त्या रिक्तच राहणार आहेत. १९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी ४५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ६८ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता कर्मचार्यांना सोरेगाव येथील एसआरपी कॅम्पच्या सभागृहात पाचारण करण्यात आले आहे, तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर त्यांची मतदानाच्या साहित्यासह मतदान केंद्रांवर रवानगी करण्यात येणार आहे. प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. इन्फो बॉक्सया आहेत ग्रामपंचायतीहणमगाव, होटगी स्टेशन, पिंजारवाडी, शिंगडगाव, बक्षीहिप्परगे, बोरामणी, दिंडूर, होटगी-सावतखेड, कुरघोट, सादेपूर, टाकळी, वडगाव-शिरपनहळ्ळी, बरुर, मद्रे, हिपळे, बोळकवठे-बंदलगी, नांदणी, तांदुळवाडी, राजूर.दृष्टिक्षेपात- १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका - २१२ जागांसाठी ३७६ उमेदवार- ६८ मतदान केंदे्र- ४५० कर्मचार्यांची नियुक्ती- निरीक्षक म्हणून साहेबराव गायकवाड (उपजिल्हाधिकारी, पुणे) यांची नियुक्ती