शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राजधानीतील महापुरावरून राजकारण; दिल्लीत पूरस्थिती जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 05:42 IST

यमुनेची पाणीपातळी घटू लागली, पूरस्थिती जैसे थे; आता मदतकार्यावर भर

सुनील चावके 

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीवर हिमाचल प्रदेश आणि हरयाणामुळे ओढवलेले परप्रांतीय महापुराचे संकट तूर्तास जैसे थेच असून, आता त्यावरुन राजकारण सुरू झाले आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांचा अपवाद वगळता जनजीवन संथगतीने पूर्वपदावर येत आहे. सर्व काही ठीक राहिले तर २०८.६२ मीटरचा ऐतिहासिक जलस्तर गाठणाऱ्या यमुना नदीची शनिवारी रात्री २०६.७२ मीटरवर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लष्कर, राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ), सरकारी यंत्रणा आणि स्वयंसेवी संघटना युद्धपातळीवर काम करून मदतकार्यासोबतच रस्ते आणि पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात गुंतले आहेत. 

शनिवारी सकाळी ११ वाजता यमुनेची पातळी २०७.४३ मीटरवर होती. याच वेगाने पाणी ओसरत राहिले आणि हिमाचल प्रदेश तसेच हरयाणात पाऊस आला नाही तर रात्री ११ वाजेपर्यंत यमुनेचा जलस्तर २०६.७२ मीटरवर येईल, असे दिल्लीच्या महसूल सचिवांचे म्हणणे आहे. दिल्लीतील यमुनेची पातळी ओसरत असली तरी महत्त्वाचे रस्ते अजूनही पाण्याखालीच आहेत. आयटीओ, राजघाट, शांतीवन, सिव्हिल लाइन्स, यमुना बाजार, यमुना खादर या भागात पाणी शुक्रवारप्रमाणे साचलेलेच होते. दिल्लीला पुराच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’ची १६ पथके मदतकार्यात गुंतली होती. तीन दिवसांत यमुनेच्या काठावरील २५ हजारांहून अधिक पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. 

हथिनीकुंडातील पाणी दिल्लीकडेच कसे? nदिल्लीत आलेल्या महापुरासाठी जबाबदार कोण यावरून आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहे. मार्गदर्शक तत्त्वांना बाजूला ठेवून हथिनीकुंडातील पाणी केवळ दिल्लीकडे येणाऱ्या पूर्व कालव्यातून सोडण्यात आल्याचा आरोप जलपुरवठामंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला.  nहरयाणा आणि हिमाचल प्रदेशातून आलेल्या पुरामुळे दिल्लीतील यमुनेला पूर आला. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हथिनीकुंडातून कशा पद्धतीने पाणी सोडले जाते, याची चौकशी व्हायला हवी, असे महसूलमंत्री आतिशी म्हणाल्या. 

पुरात अडकला तब्बल १ कोटीचा “प्रीतम”दिल्लीसह नोएडातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात आहेत. ‘गाझियाबाद एनडीआरएफ’च्या पथकाने नोएडाच्या पूरग्रस्त भागातून तब्बल १ कोटी रुपयांच्या “प्रीतम”नावाच्या सांडसह ३ गुरांची सुटका केली. भारतातील नंबर १ सांड “प्रीतम”ची सुखरूप सुटका केली, असे एनडीआरएफने ट्विटरवर लिहिले.

 

टॅग्स :floodपूरRainपाऊसdelhiदिल्ली