शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
3
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
4
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
5
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
6
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
7
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
8
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
9
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
10
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
11
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
12
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
13
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
14
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
15
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
16
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
17
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
18
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
19
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
20
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 

नात्यागोत्याच्या राजकारणाचा विळखा; घरातच सत्ता राहण्यासाठी अनेक नेत्यांचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 06:08 IST

राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत.

 थिरुवनंतपुरम : राजकारणात घराणेशाही असते याला केरळदेखील अपवाद नाही.  मुलगा, मुली, भाऊ, जावई यांच्याभोवतीच केरळचेही राजकारण फिरते आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद नसल्याचे दिसले आहे. सर्वच पक्षांनी आपल्या घरातच सत्ता राहावी यासाठी प्रयत्न केले आहेत.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे जावई आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष पी. ए. मोहम्मद रियाज हे प्रथमच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. बीयपूर येथून ते आपले भवितव्य अजमावत आहेत. त्याच वेळी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची मुले खासदार के. मुरलीधरन आणि पद्मजा वेणुगोपाल यांना अनुक्रमे नेमोम आणि थ्रीसूरमधून उमेदवारी दिली आहे. पी. विजयन हे धर्मादममधून लढत आहेत. 

राज्याच्या १४० जागांपैकी २० जागांवर राजकारण्यांचे नातेवाईक निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी एलडीएफचे मंत्री, आमदार, विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफमधून अनेकजण नशीब अजमावत आहेत. राजकीय विश्लेषक जे. प्रभाष यांच्या मतानुसार राजकारणात नातलग, व्यापारी आणि अपक्षांना महत्त्व आहे. राजकीय पक्षांच्या अनुसार लोक त्यांना स्वीकारतात, म्हणून त्यांना उमेदवारी दिली जाते.  गंमत म्हणजे हे राजकारणी एकीकडे म्हणतात लोक स्वीकारतात म्हणून त्यांची निवड केली जाते. दुसऱ्या बाजूला आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातो. जेंव्हा पक्षाची धोरणे आणि नियम बाजूला सारून अशा लोकांची निवड होते, त्यावेळी राजकारण हे उघडे पडते.

तीन मंत्र्यांचे पुत्र अजमावत आहेत नशीब यंदा निवडणुकीत तीन मंत्र्यांचे पुत्र नशीब अजमावत आहेत. माजी मंत्री इब्राहीम कुंजू ज्यांना आयुएमएलने डावलले. त्यांचे चिरंजीव पी. ई. अब्दुल  गफूर (कलामेसरी) हे उभे आहेत. काँग्रेसचे माजी आमदार के. अच्युतन (युडीएफ) यांचे चिरंजीव सोमेश के. अच्युतन, माजी मंत्री एन. विजयन पिल्लई यांचे चिरंजीव एलडीएफचे उमेदवार डॉ. व्ही. सुजित (चावरा), माजी मंत्री थॉमस चंडी यांचे बंधू थॉमस के. थॉमस (कुट्टनाड), माकपचे सचिव ए. विजयराघवन यांच्या पत्नी आर. बिंदू (इरंजलकुड्डा), सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन यांचे जावई पी. व्ही. श्रींजीन (कुन्नुथुनाद) हे आपले नशीब अजमावत आहेत.काँग्रेस नेते पी. जे. जोसेफ यांचे जावई डॉ. जोस जोसेफ (कोथंमगलम) हे उभे आहेत. त्याशिवाय माजी मंत्री एम. के. मुनीर (कुडुवेली), शिबू बेबी जॉन (छावरा), अनुप जेकब (पिरावोम), के. एस. सबरीनाथन (अरुविक्करा) हेही आपले नशीब अजमावत आहेत. मागील विधानसभेत सहा मंत्र्यांची मुले निवडून आली होती.

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१