शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईला बॉलिवूडची कोडी सोडवण्यात रस; त्यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष- चेतन भगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 19:08 IST

देशातील जनतेलाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल, तर राजकारणी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?; भगत यांचा सवाल

देश सध्या अतिशय मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र या संकटाकडे देशातील तरुणांचं लक्ष नाही. नागरिकांनी अशाच प्रकारे देशाच्या आर्थिक स्थितीकडे दुर्लत्र केल्यास देशाची अवस्था आणखी बिकट होईल, असं मत प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी व्यक्त केलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशाची आर्थिक स्थिती आणि त्याकडे जनतेचं होत असलेलं दुर्लक्ष याबद्दल आपली परखड मतं व्यक्त केली.'देशातील जनतेला अर्थव्यवस्थेची काळजी नाही. आपले तरुण तर अर्थव्यवस्थेच्या स्थितीकडे दुर्लक्ष करुन बॉलिवूडमधील कोडी सोडवत बसले आहेत. लोकांना अर्थव्यवस्थेची काळजी नसल्याचं सरकारला माहीत असतं. त्यामुळेच सरकारदेखील अर्थव्यवस्थेतील संकटं दूर करण्यासाठी वेळ खर्च करत नाहीत. लोकच ढासळलेल्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलत नसतील. त्यांनाच काळजी नसेल, तर मग राजकारणी तरी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?,' असा प्रश्न भगत यांनी उपस्थित केला आहे.ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगना प्रकरण- अमोल कोल्हे ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे वाढलेल्या बेरोजगारीवरही चेतन भगत यांनी भाष्य केलं. 'पुढील वर्षी पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या किती मुलांना सुरक्षित नोकऱ्या मिळणार आहेत? एक तर त्यांना बॉलिवूडच्या केसेस सोडवत बसावं लागेल किंवा आपल्याला नोकरी कशी मिळेल? याचा विचार करण्यात त्यांचा वेळ जाईल,' असं भगत म्हणाले.चेतन भगत यांनी नुकतंच एका स्तंभामध्ये देशातील सध्याच्या आर्थिक संकटाबाबत लिहिलं होतं. जर या परिस्थितीवर तोडगा काढला गेला नाही, तर सर्वसामान्य जनता आणखी गरीब होत जाईल, असं भगत यांनी म्हटलं. तरुणांनी आता आपल्या मोबाईल फोनकडे पाहणं थांबवायला हवं आणि अर्थव्यवस्थेबद्दल बोलायला हवं. सध्याच्या क्षणाला भारतीय तरुण त्यांच्या अवतीभवती काय घडतंय याकडे दुर्लक्ष करत आहेत,' असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला होता.

टॅग्स :Chetan Bhagatचेतन भगतcorona virusकोरोना वायरस बातम्या