शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली चित्रपटसृष्टीचा राजकीय प्रवासही गंमतीदार; आता तृणमूल व भाजपकडे कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 05:48 IST

मिथुनदाच्या राजकारणाचे वर्तुळ झाले पूर्ण  

कोलकाता : दक्षिणेच्या राजकारणावर असलेला तेथील चित्रपटसृष्टीचा प्रभाव सर्वज्ञात आहे; पण बंगाली चित्रपटसृष्टीही पश्चिम बंगालच्या राजकारणात  कायम सक्रिय राहिली आहे. एके काळी काँग्रेस व डाव्या पक्षांवर टॉलीवूडचा प्रभाव होता; पण आता ती चित्रपटसृष्टी तृणमूल व भाजपमध्ये विभागली गेली आहे.   राज्यात काँग्रेसची सत्ता असताना उत्तम कुमारसारखा लोकप्रिय अभिनेता काँग्रेसचा समर्थक होता. इतरही अनेक होते. काँग्रेस व उत्तम कुमार यांचे समर्थक व चाहते करोडो होते. पुढे त्याचवेळी सत्यजित राय, मृणाल सेन, ऋत्विक घटक, उत्पल दत्त या डावीकडे झुकणाऱ्या मंडळींचाही राजकारणावर  प्रभाव दिसत होता. तो त्यांच्या चित्रपटांवरही दिसत होता. नक्षलवादी चळवळही वाढत असताना बंगाली चित्रपटांत सामाजिक व राजकीय विषय अधिक होते.  पुढे यांचे टॉलीवूडवरील वर्चस्व कमी होत गेले. आर्थिक उदारीकरणामुळे हिंदीप्रमाणेच बंगाली चित्रपटांचे विषय व मांडणी यातही बदल होत गेला. समाजाच्या आचारविचारांत बदल झाला. त्यामुळे डाव्यांच्या हातून सत्ता गेली, डावी चळवळ कमजोर झाली आणि काँग्रेसची दुरवस्थाच झाली. 

मिथुनदाच्या राजकारणाचे वर्तुळ झाले पूर्ण  n    चित्रपट अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या राजकारणाचे वर्तुळ रविवारी पूर्ण झाले. एके काळी डाव्या पक्षांबरोबर असणाऱ्या, नक्षलवादी चळवळीचे समर्थन करणाऱ्या  आणि नक्षलवादी नावाच्या चित्रपटात प्रमुख भूमिका करणाऱ्या मिथुनदांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. n    डाव्या पक्षांना सोडून त्यांनी नंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात आले; पण ते राज्यसभेत फारसे फिरकलेच नाहीत. शारदा चिट फंड घोटाळ्यात त्यांचे नाव आले, त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि आता भाजपची वाट धरली. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMithun Chakrabortyमिथुन चक्रवर्ती