शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी...", मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:44 IST

'ऑपरेशन सिंदूर' वरुन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

"ऑपरेशन सिंदूर' हे नाव राजकीय आकर्षण मिळवण्यासाठी जाणूनबुजून देण्यात आले आहे. जेव्हा सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात आणि देशाच्या हितासाठी परदेशात पोहोचतात तेव्हा केंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर केली. आम्ही ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात आहोत, पण पंतप्रधान मोदी देशभरात सभा घेण्यात व्यस्त आहेत, असंही बॅनर्जी म्हणाल्या. 

Maharashtra Politics : "ज्यांना अर्थसंकल्प कळत नाही, त्यांनी..."; लाडकी बहीण योजनेच्या निधीवरुन फडणवसांनी स्पष्टच सांगितलं

"पंतप्रधान जे बोलत आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहे. जर विरोधी पक्ष परदेशात जात असेल तर ते देशाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी आणि लोकशाहीचा आवाज उठवण्यासाठी जात आहेत, देशाची बदनामी करण्यासाठी नाही. हे ऑपरेशन बंगाल करण्याबाबत गोष्टी करत आहेत. मी त्यांना उघड आव्हान देते की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी उद्याच निवडणुकीची तारीख जाहीर करावी, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

उद्या निवडणुका घ्या, आम्ही तयार

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींनी बंगालच्या महिलांचा अपमान केला आहे. आम्ही सर्वांचा आदर करतो, पण आमच्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही. त्यांना 'ऑपरेशन बंगाल' म्हणण्याची हिम्मत कशी होते? जर असे असेल तर उद्या निवडणुका जाहीर करा, आम्ही तयार आहोत.ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत मध्य प्रदेश भाजप नेते मनोहरलाल धाकड यांचा मुद्दाही उपस्थित केला. त्या म्हणाल्या, "मध्य प्रदेशात जे घडले त्याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जणू रस्त्यावर अश्लील व्हिडीओ वाजत आहेत."

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना लाईव्ह चर्चेचे आव्हान दिले

पंतप्रधान मोदींवर ऑपरेशन सिंदूर वरुन आरोप करत ममता बॅनर्जी यांनी सवाल उपस्थित केले. पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगार कुठे आहेत? त्यांना पकडले गेले का? नाही, पण तुम्ही बंगालची बदनामी करत आहात. आज जेव्हा आमच्या पक्षाचे खासदार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे रक्षण करत आहेत, तेव्हा पंतप्रधान आमच्या राज्याची बदनामी करण्यासाठी बंगालमध्ये येतात, असा आरोपही बॅनर्जी यांनी केला. यावेळी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना थेट चर्चेसाठी आव्हान दिले आणि म्हणाल्या की जर तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत लाईव्ह टीव्ही चर्चेत बसा. तुम्हाला हवे असेल तर टेलीप्रॉम्प्टर घेऊन या. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीOperation Sindoorऑपरेशन सिंदूर